हळूच मजला पाहशील का? - मराठी कविता

हळूच मजला पाहशील का?, मराठी कविता - [Haluch Majala Pahshil Ka, Marathi Kavita] प्रित फुला रे आज अवचित असा अचानक येशील का?, लाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का?

प्रित फुला रे आज अवचित असा अचानक येशील का?, लाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का?

प्रित फुला रे आज अवचित असा अचानक येशील का?
लाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का?
तुझीच वेडी धुंद होऊनी रात्र रात्र मी जागताना
इंद्रधनुचे सप्तरंग तु स्वप्नी माझ्या भरशील का?

क्षणाक्षणाला कणाकणांमध्ये भास तुझा रे होताना
आयुष्यात माझ्या तु गंध प्रीतीचा भरशील का?
प्रित फुला रे आज अवचित असा अचानक येशील का?
लाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का?

ओढ मला रे तुझी असताना सहवासाने तुझ्या
मला स्वर्गसुख तू देशील का?
कधी अचानक पाऊस बनुनी चिंब भिजवूनी जाशील का?
स्वप्नामधल्या स्वप्न फ़ुला रे वास्तवात तू येशील का?
प्रित फुला रे आज अवचित असा अचानक येशील का?
लाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का?

तुझ्या वाचुनी जगणे माझे व्यर्थ असे रे असताना
उगाच “तिला” तू पाहशील का?
झुरताना मी तुझ्याचसाठी तु कुणावर भाळशील का?
साथ मी देईन तुलाच जन्मभर तुही माझाच राहशील का?
प्रित फुला रे आज अवचित असा अचानक येशील का?
लाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का?

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.