जोगवा - मराठी कविता

जोगवा, मराठी कविता - [Jogwa, Marathi Kavita] मागितला जोगवा, करीत बाबा बाबा, पितृप्रेमाची तहान, थोडीतरी भागवा.

मागितला जोगवा, करीत बाबा बाबा, पितृप्रेमाची तहान, थोडीतरी भागवा

मागितला जोगवा
करीत बाबा बाबा
पितृप्रेमाची तहान
थोडीतरी भागवा!
जोगवा घाल गं
मायेच्या माऊली
प्रेमाची साऊली
तूच माझी!
कैसा मागू तुला
जोगवा भाऊराया
तववरी माया
करावी मीच!
पतीघरी आले
सोडूनिया छत्र
जोगवा झाले...!
वृद्धत्व येताच
पुत्रापुढे हाट
पसरोनी मग
मागने जोगवा!
जीवाची तगमग
साहवे ना आता
अंतःकाळी जोगवा
मागते विठूपाशी!


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.