देशहितासाठी कुणी, देशभक्त हुतात्मे झाले, आज केवळ खुर्चीसाठी, सारे देशद्रोही झाले
देशहितासाठी कुणी, देशभक्त हुतात्मे झाले
आज केवळ खुर्चीसाठी, सारे देशद्रोही झाले
जो तो उगाच दाखवी, नाटक माणूसपणाचे
स्वार्थ शोधण्यात दांभिक, स्वामीही दंग झाले
हल्लीचे देशभक्त ओढती, आयत्या पिठावर रेघा
लाच लुचपतीवर बरेच, बदमाष लाल झाले
ओठात गोड भाषा, डोळ्यात कपटी नशा
म्हणूनच अमृताचेम आज विष झाले
उरली तृष्णा इथेही, कामुक वासनेची
माणसेही सारे, आज हैवान झाले
जातीचे रंग शोधतात, कित्येक भडवे बिचारे
राऊळावरील झेंडेही, म्हणूनच उदास झाले