संदेह - मराठी कविता

संदेह, मराठी कविता - [Sandeh, Marathi Kavita] बकऱ्याचा बळी, देवापुढे मान, गवे पाषाण, निष्ठुरच.

बकऱ्याचा बळी, देवापुढे मान, गवे पाषाण, निष्ठुरच

बकऱ्याचा बळी । देवापुढे मान
भगवे पाषाण । निष्ठुरच

वाईट कृत्याचा । केला उहापोह
नको तसा मोह । नश्वराचा

पुढच्यास ठेच । मागचा शहाणा
उताविळपणा । पश्चातापी

पाऊले चालती । कुकर्माची वाट
अधोगती घाट । पुढे पुढे

सोलून चामडी । उसविला देह
तरीही संदेह । ईश्वराचा


धोंडोपंत मानवतकर | Dhondopant Manwatkar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.