खंत - मराठी कविता
खंत, मराठी कविता - [Khant, Marathi Kavita] सज्जन कोण अन्, दुर्जन कोण.
सज्जन कोण अन्, दुर्जन कोण
सज्जन कोण अन्
दुर्जन कोण
आताशा संताबद्दलही
मी काय सांगावं
नवरा नपुंसक असतानाही
पोरगा का पोरगी? म्हणून
देवाला काय मागावं
हीच तर इथे
खंत आहे
माळ, गंध, जटा राखूनही
सारं सारं खातो
दारुत न्हातो
तोच लुटारु भक्तांचा
थोर संत आहे
मराठी कविता या विभागात लेखन.