सल - मराठी कविता

सल, मराठी कविता - [Sal, Marathi Kavita] जखमेतून ओल्या, भळाळा वाहणाऱ्या, रक्ताच्या वेदनाना.

जखमेतून ओल्या, भळाळा वाहणाऱ्या, रक्ताच्या वेदनाना

जखमेतून ओल्या
भळाळा वाहणाऱ्या
रक्ताच्या वेदनाना
महत्त्व व देता
त्या रक्ताचे डाग
कपड्यावर पडू न देणे
आधिक जपलेस!
डोळ्यातले कुसळ
सहज निघण्यास्तव
अपेक्षून फुंकर
समोर की आले
चोळलास डोळा
रूतले ते कुसळ
अंतरीची सल
नेत्रावाटे वाहिली


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.