आशा हीच सखी - मराठी कविता

आशा हीच सखी, मराठी कविता - [Asha Heech Sakhi, Marathi Kavita] नको आणू सखया, नैराश्याची सवत, आशा हीच सखी.

नको आणू सखया, नैराश्याची सवत, आशा हीच सखी

नको आणू सखया
नैराश्याची सवत
आशा हीच सखी
भान ठेव सतत
बसशी झुल्यावर
जव तू आशेच्या
फुटे रे पालवी
मनी वसंतीच्या
चिंतनाला फुटावा
आशेचा धुमारा
मनमोर नाचेल
फुलवून पिसारा
ग्रीष्माच्या उन्हात
जीव जगे सुखात
सुखस्वप्न पहात
आशेच्या अंगणात
धूसर वलये
प्रतिमा निराशेची
कशाला शिदोरी
बांधू भग्न स्वप्नांची
टाक पाऊल पुढे
सोडून आता खंत
नको आणूस सखया
नैराश्याची सवत


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.