कुठं, कसं कळत नाही, चूक रक्तातली की बीजातली, नसातली की मांसातली
कुठं, कसं कळत नाहीचूक रक्तातली की बीजातली
नसातली की मांसातली
कळत नाही अंतरातलं काही
मात्र चुकत गेलंय बरंच काही
कानांनी ऐकलं नाही
डोळ्यांना दिसलं नाही
स्पर्शानं जाणवलं नाही
की कसला वास नाही
नक्कीच चुकलंय काही
दगड नसताही ठेच लागली
बोच नसताही डोळ्यात लाली
नीरव शांततेच आली बधीरता
नसता पाणी लोचनी सजलता
जाणवत राहतो चुकीचा परिणाम
सारे काही वाटते कुचकाम
काय चुकलंय कळत नाही
शिक्षा मात्र जाळत राही