वादळ झेलताना - मराठी कविता

वादळ झेलताना, मराठी कविता - [Vadal Jheltana, Marathi Kavita] वादळानं त्रस्त झालेला, तहानलेला तो किनार, आशाळभूत पणे, सागराकडं पहात होता.

वादळानं त्रस्त झालेला, तहानलेला तो किनार, आशाळभूत पणे, सागराकडं पहात होता

वादळानं त्रस्त झालेला
तहानलेला तो किनार
आशाळभूत पणे
सागराकडं पहात होता
त्याला वाटत होतं
आपल्यालाही त्या लाटांची
सामावून घ्यावं...
तहानलेल्या मनाला
तृप्त करावं...!
आपल्याच मस्तीस बेभान
झालेलं ते पाणी...
किनाऱ्याकडं न येता
उंच उंच लाटात
बुडून गेलं होतं...!
तो किनारा...
तसाच कोरडा
वादळ झेलत उभा असताना
नागमोडी वळणं घेत
ती सरिता आली
सागराच्या किनाऱ्याला
तृप्त करूनच,
सागरात सामावली
सागराच्या खारट पाण्यापेक्षा
सरितेच्या अमृत जलाने
न्हाऊन निघालेला किनारा
तृप्त झाला


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.