झरोका - मराठी कविता

झरोका, मराठी कविता - [Jharoka, Marathi Kavita] ज्या स्वप्नांच्या झरोक्यातून, पाहिलं होतं,, दिलासा देणारं रूप.

ज्या स्वप्नांच्या झरोक्यातून, पाहिलं होतं, दिलासा देणारं रूप

ज्या स्वप्नांच्या झरोक्यातून
पाहिलं होतं,
दिलासा देणारं रूप
आश्वासक डोळे,
पिळदार बाहू
तो स्वप्नांचा झरोका
जपला हृदय संपुष्टात!
जीवघेण्या स्पंदनाने उघडला
तो अचानक
झरोक्यातून नाही दिसले
तुझे कोणतेच रूप
दिसली फक्त कोळीष्टकं
झरोक्यातून लोंबणारी
स्वप्नांना वेढणारी


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.