सगळंच काही नसतं, घालायचं कंसात, कधी लागतो अर्धविराम, तर काहीना स्वल्पविराम
सगळंच काही नसतंघालायचं कंसात!
कधी लागतो अर्धविराम
तर काहीना स्वल्पविराम
पूर्ण विरामानेही काहींची
पूर्तता होत नाही
मग, विचार करायला
लागतं प्रश्नचिन्ह!
चिंतनाच्या गुहेतून
अजाणता येतो उद्गार!
पण ते असतं स्वगत
बसत नाही कंसात
त्याचे स्थान फक्त मनात