कोंदण - मराठी कविता

कोंदण, मराठी कविता - [Kondan, Marathi Kavita] दुःखाच्या कणाकणानी, भारावून गेलेली मी, सुखाच्या कणात, न्हाऊन जात नाही

दुःखाच्या कणाकणानी, भारावून गेलेली मी, सुखाच्या कणात, न्हाऊन जात नाही

दुःखाच्या कणाकणानी
भारावून गेलेली मी
सुखाच्या कणात
न्हाऊन जात नाही
वेचीत बसते सुखाचे कण
दुःखाचे कोंदण ल्यालेले!
अन्‌ अचानक
सापडतो आनंदाचा डोह
कोंदणाकडं बघताना
मग वेडच लागते
सुखाचे कण शोधण्याचे
दुःखाचे कोंदण घालण्याचे
सुखाने दुःख निवळते
की, दुःखाचे सुख उजळते
याची जाणीव होत नाही
सुखदुःखाची बेरीज मात्र
जीवनमूल्य उजळते


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.