अंगण - मराठी कविता

अंगण, मराठी कविता - [Angan, Marathi Kavita] खेळायला अंगण दिलंस पण, मातीवरचा हक्क नाही सोडलास.

खेळायला अंगण दिलंस पण, मातीवरचा हक्क नाही सोडलास

खेळायला अंगण दिलंस पण...
मातीवरचा हक्क नाही सोडलास
निसर्गाची आवड असणाऱ्या मला
झाडं लावण्याची मुभा दिलीस पण...
झाडावरची फुलं मात्र तूच वेचलीस
मी लांबूनच घेतला वास...
मातीची ओढ अनावर झाली
तेव्हा सडा शिंपला
रांगोळी घालऱ्याचा बहाणा करत
मातीचा वास घेतला
त्याचवेळी मंद वाऱ्याची झुळुक आली
मातीत फुलाचा वास मिसळून गेली
रिक्त ओंजळीत भास झाला फुलांचा
मनानं स्वीकार केला नसलेल्याचा
हे स्वीकाअलंपण तू घेणार नव्हतास
दिलेलं अंगण परत मागणार नव्हतास
याच समाधानानं दिवस काढले
तूच दिलेल्या अंगणात अशी विसावले


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.