अंतरीचे नेत्र - मराठी कविता

अंतरीचे नेत्र, मराठी कविता - [Antariche Netr, Marathi Kavita] अंतरीच्या नेत्रात गं, जीवन निरांजन पाजळे, अनुभवाचे तेल जळे, दुःखासवे सुख होरपळे.

अंतरीच्या नेत्रात गं, जीवन निरांजन पाजळे, अनुभवाचे तेल जळे, दुःखासवे सुख होरपळे

अंतरीच्या नेत्रात गं
जीवन निरांजन पाजळे
अनुभवाचे तेल जळे
दुःखासवे सुख होरपळे
अंतरीच्या नेत्राची गं
जाणीव अजाणता जाहली
गतकाळाचे थेंब झाले
पापणी भिजू भिजू राहिली
अंतरीचे नेत्र माझे
भाविष्याचे वेध त्याला
अर्ध मिटल्या नयनीच
पाहती ते जगताला
अंतरीच्या नेत्रास गं
नाही अंधत्व, मोतीबिंदू
नेत्री असे भरलेला
जीवनाचा सकळ सिंधु
अंतरीच्या नेत्राची गं
असावी आठवण जागती
जपते मी अंतरी
हिच मनिषा मनोगती


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.