चहा मसाला - पाककृती
चहा मसाला, पाककला - [Tea Masala, Recipe] खिमटी पावसाळ्यात किंवा थंडीत हा ‘चहाचा मसाला’ घालून चहा करावा.
कडक, मसालेदार चहा बनविण्यासाठी चहा मसाला
‘चहा मसाला’साठी लागणारा जिन्नस
- २५ ग्रॅम काळी मिरी
- २ टी.स्पून सूंठ पूड
- ७-८ लवंगा
- २-३ दालचिनीच्या काड्या
- २-३ वेलदोडे
- २-३ मोठी वेलची
‘चहा मसाला’ची पाककृती
- सर्व साहित्य एकत्र करुन बारीक कुटावे व चाळुन ठेवावे.
- पावसाळ्यात किंवा थंडीत हा मसाला घालून चहा करावा.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.