कुरकुरीत आणि खमंग असा झटपट होणारा झटपट रवा डोसा
झटपट रवा डोसा - भुक लागली असता झटपट करता येण्यासारखा हा रव्याचा डोसा आहे, कुरकुरीत आणि खमंग असा झटपट रवा डोसा.
झटपट रवा डोसा करण्यासाठी लागणारा जिन्नस
- १ वाटी बारीक रवा
- १ वाटी तांदळाची पिठी
- १ वाटी मैदा
- १ वाटी आंबट दही
- तेल
- मीठ
झटपट रवा डोसा करण्याची पाककृती
- डोसे करायच्या आधी २ तास १ वाटी बारीक रवा, १ वाटी तांदळाची पिठी, १ वाटी मैदा, १ वाटी आंबट दही घालुन सरसरीत भिजवा.
- थोडे पाणी घालून ज्याप्रमाणे आपण ईडली किंवा डोशाचे बॅटर करतो त्याप्रमाणे हे पीठ बनवा.
- त्यात २ टेबलस्पून कडकडीत तेल व चवीला मीठ घाला.
- डोशाच्या तव्यावर डावाने पातळ धिरड्याप्रमाणे डोसा घालावा व बाजूने तेल सोडा.
- तव्यावर झाकण ठेवून २ - ३ मिनीटे शिजवून घ्या.
- कडा सुटायला लागल्यावर हलकेच काढून चटणीबरोबर खाण्यास द्या.
जीवनशैली पाककला