उपवासाला खाता येणारा शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा
शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा, पाककला - (Shingadyachya Pithacha Dhokla, Recipe) चटपटीत आणि उपवासाला खाता येईल असा अस्सल महाराष्ट्रीय ‘शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा’ तुम्ही वेगळी चव म्हणुन करु शकता.
शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा करण्यासाठी लागणारा जिन्नस
- २ वाट्या शिंगाड्याचे पीठ
- १ वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट
- २ वाट्या आंबटसर ताक
- मीठ
- २ - ३ हिरव्या मिरच्या
- आले
- १ चमचा जीरे
- खायचा सोडा
शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा करण्याची पाककृती
- सकाळी शिंगाड्याच्या पिठात ताक घालून भिजवत ठेवावे.
- २ - ३ तासांनी त्यात अंदाजे मीठ, वाटलेल्या हिरव्या मिरच्या व आले, दाण्याचे कूट, थोडेसे जीरे व सोडा घालून चांगले ढवळून घ्यावे.(रंग हवा असल्यास हळद घालावी.)
- नंतर स्टीलच्या चपट्या डब्याला तूपाचा हात लावून त्यात पीठ घालावे व कुकरमध्ये अर्धा तास वाफवून घ्यावे.
- जरा निवल्यानंतर वड्या कापाव्यात.
- वरती थोडेसे ओले खोबरे व कोथिंबीर घालावी.
- तयार आहे शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा.
शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा म्हणजे उपवास असलेल्या मंडळींसाठी चटपटीत पदार्थ.
जीवनशैली पाककला