आरारूटची लापशी - पाककृती

आरारूटची लापशी,पाककला - [Arrowrootchi Lapsi,Recipe] अत्यंत चविष्ट, खमंग आणि पौष्टिक अशी ‘आरारूटची लापशी’ लहान मुलांपासुन वयस्करांपर्यंत सर्वांसाठीच.
आरारूटची लापशी - पाककला | Arrowrootchi Lapsi - Recipe

चविष्ट, खमंग आणि पौष्टिक ‘आरारूटची लापशी’

आरारूटच्या लापशीसाठी लागणारा जिन्नस

  • १ टेबलस्पून आरारूट
  • १ १/२ कप दूध
  • २ चमचे साखर
  • २ थेंब व्हॅनिला इसेन्स

आरारूटच्या लापशीची पाककृती

  • १/२ कप गार दूधात आरारूट घालून त्याची चांगली पेस्ट करुन घ्यावी.
  • नंतर १ कप दुधात साखर घालून त्याला उकळी आणावी.
  • नंतर त्यात वरील आरारूटची पेस्ट घालून मिश्रण चांगले ढवळावे, २ थेंब व्हॅनिला इसेन्स घालावा.
  • जरा दाटसर झाले, की उतरवावे.
  • आवडत असल्यास त्यात चिमूटभर मीठ टाकावे.
  • गरमागरम आरारूटची लापशी सर्व्ह करावी.
अशीच तांदुळाच्या पिठाची, बार्लीच्या पिठाची किंवा ओटच्या पिठाची लापशी करावी.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.