कैरीचे पन्हे प्रकार १ - पाककृती

कैरीचे पन्हे प्रकार १, पाककला - [Kairiche Panhe Type 1, Recipe] उन्हाळ्यात थंडाव्यासाठी तसेच उष्णतेने मंदावलेली पचनशक्ती पुन्हा सुरळीत करण्यासाठी हे कैरीचे पन्हे उपयोगी ठरते.
कैरीचे पन्हे प्रकार १ - पाककला | Kairiche Panhe Type 1 - Recipe

उन्हामुळे मंदावलेली पचनशक्ती सुधारणारे कैरीचे पन्हे

‘कैरीचे पन्हे प्रकार १’साठी लागणारा जिन्नस

  • ५०० ग्रॅम कैऱ्या
  • साखर
  • १ चमचा मीठ

‘कैरीचे पन्हे प्रकार १’ची पाककृती

  • कैरीची साले काढून त्या अख्ख्या किंवा फोडी करून स्टीलचा भांड्यातून कुकरमध्ये उकडून घ्याव्यात.
  • थंड झाल्यावर कैरीचा गर व साखर मिक्सरमधून अथवा पुरणयंत्रामधून काढावा.
  • जेवढा गर असेल त्याच्या अडीच पट साखर घातली तर ते व्यवस्थित गोड होते व हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकते.
  • पन्हे करताना थोड्या गरात थंड पाणी व किंचित मीठ घालावे आणि प्यायला द्यावे. याची चव फारच छान लागते.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


२ टिप्पण्या

  1. एकदम मस्त
  2. एकदम मस्त
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.