पनीर टिक्का - पाककृती

पनीर टिक्का, पाककला - [Paneer Tikka, Recipe] मुळचा पंजाबी मात्र सर्वत्र प्रसिध्द असलेला चटपटीत पनीर टिक्का हा पनीर, बटर, कसुरी मेथी वगैरे पदार्थ घालून हॉटेल मध्ये मिळणार्‍या पनीर टिक्का सारखीच चव आपण घरी आणू शकता. हा पदार्थ स्टार्टर मध्ये खातात.
पनीर टिक्का - पाककला | Paneer Tikka - Recipe

घरच्या घरी बनवा चटपटीत पनीर टिक्का

‘पनीर टिक्का’साठी लागणारा जिन्नस

 • २०० ग्रॅम पनीर
 • १०० ग्रॅम दही
 • २५ ग्रा. मैदा
 • लसूण
 • आलं
 • १/२ चमचा जीरे पावडर
 • १/२ चमचा गरम मसाला
 • १ मिली. ऑरेंज कलर
 • ५० ग्रॅम बटर
 • ७५ ग्रॅम टोमॅटो
 • ३० मिली. क्रीम
 • १/२ चमचा लाल मिरची
 • १/२ चमचा कसुरी मेथी
 • मीठ

‘पनीर टिक्का’ची पाककृती

 • दह्यामध्ये ऑरेंज कलर, मैदा, मीठ, जीरे व गरम मसाला घुसळावा.
 • पनीरचे तुकडे तळावे.
 • एका पातेल्यात लोणी टाकून त्यात आलं, लसूण टाकून २ मिनीट भाजल्यावर कापलेले टोमॅटो, लाल मिरची पावडर टाकून परत भाजावे.
 • नंतर दही, क्रीम टाकून भाजावे. त्यावर तूप सोडल्यानंतर कस्तूरी मेथी टाकावी.
 • पनीर बाउलमध्ये जमवावे. त्यावर क्रीम व कोथिंबीर टाकून सजवावे.
 • तयार आहे पनीर टिक्का

स्टीक मध्ये तयार पनीरचा तुकडा, शिमला मिरचीचे तुकडे घालून एकात एक अडकवू शकता.
स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.