आंबट - गोड असलेले लेमन डिलिशियस पुडिंग
‘लेमन डिलिशियस पुडिंग’साठी लागणारा जिन्नस
- २ मोठे चमचे पांढरे लोणी
- पाऊण वाटी साखर
- १ मोठे लिंबू
- १ कप दूध
- २ अंडे
- २ मोठे चमचे मैदा
- एक चिमटी मीठ
‘लेमन डिलिशियस पुडिंग’ची पाककृती
- अंड्यातले पिवळे व पांढरे वेगवेगळे फेटावे.
- लोणी व साखर मिसळून हाताने किंवा मिक्सरमध्ये खूप फेटावे.
- मैद्यात मीठ घालून चाळून घ्यावा.
- लिंबाची साल कापून किसून घ्यावी व लिंबाचा रस काढून वेगळा ठेवावा.
- लोणी व साखरेत चाळलेला मैदा, लिंबाच्या सालीचा कीस, लिंबाचा रस, अंड्यातले पिवळे व दूध घालून मिश्रण घोटून घ्यावे.
- अंड्यातले फेसलेले पांढरे हळूहळू मिश्रणात घालून पुन्हा एकजीव होईपर्यंत घोटावे.
- ओव्हनमध्ये ठेवण्यासाठी ओव्हनप्रूफ भांडे आतल्या बाजूने ओले करावे व त्यात हे मिश्रण ओतावे.
- दुसऱ्या एका उथळ भांड्यात किंवा ट्रेमध्ये पाणी घालून त्यात मिश्रणाचे भांडे ठेवावे. मध्यम ओव्हनमध्ये ३० ते ४० मिनिटे भाजावे.
लेमन डिलिशियस पुडिंग चवीला आंबट - गोड लागते.
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ