पनीर बटर मसाला - पाककृती

पनीर बटर मसाला, पाककला - [Paneer Butter Masala, Recipe] मुळचा पंजाबी मात्र सर्वत्र प्रसिध्द असलेला पनीर बटर मसाला हा पनीर, बटर, कसुरी मेथी वगैरे पदार्थ घालून घरच्या घरी बनवला जाऊ शकतो आणि अगदी हॉटेल मध्ये मिळणार्‍या पनीर बटर मसाल्या सारखीच चव आपण घरी आणू शकता.
पनीर बटर मसाला - पाककला | Paneer Butter Masala - Recipe

घरच्या घरी बनवा पनीर बटर मसाला

‘पनीर बटर मसाला’साठी लागणारा जिन्नस

 • १०० ग्रॅम पनीर
 • ५० ग्रॅम दही
 • २५ ग्रॅम काजू
 • कोथिंबीर
 • मिरची
 • ५० ग्रॅम लोणी
 • कसुरी मेथी
 • २ कांदे
 • २ टोमॅटो
 • जीरे
 • खडा मसाला
 • आले व लसणाची पेस्ट
 • सजावटीसाठी क्रीम
 • गरम मसाला टाकावा
 • मीठ

‘पनीर बटर मसाला’ची पाककृती

 • कांद्याच्या पातळ उभ्या कापून तळून घ्यावेत.
 • पनीरचे तुकडे करून तळावेत.
 • काजूमध्ये दुध घालून थोडे वाटून घ्यावे.
 • मग टोमॅटो व तळलेला कांदा एकत्र वाटावा.
 • एका भांड्यात तेल गरम करावे.
 • त्यात जीरे व खडा मसाला टाकावा. छान वास सुटल्यावर आले व लसणाची पेस्ट टाकवी.
 • नंतर वाटलेला कांदा व टोमॅटो टाकावे या सर्वांना मिक्स करून मीठ, मिरची व गरम मसाला टाकावा. कसुरी मेथीही टाकावी. व्यवस्थित ढवळून घ्यावे.
 • ढवळून झाल्यावर पनीर, दही टाकून उकळी काढून गॅस बंद करावा.
 • वरून कोथिंबीर व क्रीम टाकुन सजवावे.
पनीर बटर मसाला रोटी, नान, कुल्च्यासोबत खाऊ शकता.
स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.