मिक्स दाल पराठा - पाककृती

मिक्स दाल पराठा, पाककला - [Mix Dal Paratha, Recipe] कणीक, रवा आणि वेगवेगळया प्रकारच्या डाळीयुक्त पौष्टिक, चविष्ट मिक्स दाल पराठा सॉस किंवा चटणी सोबत न्याहारी किंवा डब्यात देता येतील.
मिक्स दाल पराठा - पाककला | Mix Dal Paratha - Recipe

सर्व डाळींनी युक्त चटपटीत मिक्स दाल पराठा

‘मिक्स दाल पराठा’साठी लागणारा जिन्नस

 • ३ वाट्या कणीक
 • १/४ वाटी बारीक रवा
 • मीठ
 • १/२ वाटी तेल
 • ओवा

सारणासाठी लागणारा जिन्नस

 • १/४ वाटी प्रत्येकी तूरडाळ, चणाडाळ, मसूरडाळ, हरभरा डाळ
 • १ टे. स्पून आले-लसूण-मिरची पेस्ट
 • तिखट
 • मीठ
 • अनारदाणा/आमचूर पावडर
 • कोथिंबीर
 • गरम मसाला

‘मिक्स दाल पराठा’ची पाककृती

 • कणीक, रवा, मीठ व तेल घालून भिजवून १ तास ठेवावे.
 • नंतर मळून एकसारखे गोळे करावे.
 • डाळी भिजवून २-३ तासांनी रवाळ वाटाव्यात.
 • तेल तापवून ओव्याची फोडणी करावी.
 • डाळीचे मिश्रण घालून परतून २ वाफा आण्याव्यात. त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट, मीठ, कोथिंबीर, गरम मसाला घालून परतावे.
 • आमचूर पावडर घालून उतरावे.
 • कणकेचे व सारणाचे सारखे भाग करुन पराठा लाटावा.
 • मिक्स दाल पराठे पौष्टिक व चवदार होतात.
स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.