आवळा मुरंबा - पाककृती

आवळा मुरंबा, पाककला - [Sweet Lime Pickle, Recipe] जीवनसत्व क, पित्तनाशक असा ‘आवळ्याचा मुरंबा’ थंड असल्यामुळे खास करुन उन्हाळ्यात किंवा रोज सकाळी एक चमचा पित्त असलेल्या व्यक्तींनी घेतल्याने फायदा होईल.
आवळा मुरंबा- पाककला | Sweet Lime Pickle - Recipe

जीवनसत्व क, पित्तनाशक ‘आवळ्याचा मुरंबा’

‘आवळा मुरंबा’साठी लागणारा जिन्नस

 • २ किलो आवळे
 • २ किलो साखर
 • २० ग्रॅम चुना
 • १० ग्रॅम छोटी वेलची
 • १० ग्रॅम चांदीचा वर्क
 • १ ग्रॅम केसर
 • पाणी आवश्यकतेनुसार

‘आवळा मुरंबा’ची पाककृती

 • आवळ्यांना जाड दाभणाने छेदावे.
 • चुन्याचे तीन भाग करावे.
 • चुन्याचा एक भाग पाण्यात मिसळावा आणि आवळ्यांना त्यात टाकावेत.
 • ४ तासानंतर आवळ्यांना चुन्याच्या पाण्यातुन काढुन ते पाणी फेकुन द्यावे आणि चुन्याचा दुसरा भाग पाण्यात टाकुन आवळे २४ तास भिजवावे.
 • नंतर याच प्रमाणे चुन्याचा तिसरा भाग पाण्यात टाकुन साखरेचा एका तारेचा पाक तयार करावा.
 • केसर व छोटी वेलची वाटुन त्यात मिसळावी व २४ तास भिजवलेले आवळे त्यात टाकावे.
 • थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावे.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.