जेवणातली चव वाढवणारी चटकदार गाजर द्राक्षे कोशिंबीर
गाजर आणि द्राक्षे घालुन केलेली कोशिंबीर चवीला अत्यंत चटकदार लागते, सोबत मेयोनेझ आणि खमंगपणा येण्यासाठी तिखट आणि मिरपूड असल्याने जेवणातली चव वाढते. दुपारच्या जेवणात आणि खास करून पाहूणचारासाठी ही कोशिंबीर एक वेळ नक्की करून पहावी.
गाजर द्राक्षे कोशिंबीर करण्यासाठी लागणारा जिन्नस
- २ वाट्या गाजराचा कीस (गुलाबी गाजरे जास्त छान दिसतात)
- १५-२० बिनबियांची(सीडलेस) द्राक्षे
- १ चमचा खसखस
- १ चमचा मीठ
- अर्धा चमचा साखर
- पाव चमचा लाल तिखट किंवा मिरपूड
- १ वाटी मेयोनेझ किंवा १ वाटी घरचा चक्का
- अर्धी वाटी सायीचे दही
गाजर द्राक्षे कोशिंबीर करण्याची पाककृती
- द्राक्षे धुवून अर्धी-अर्धी चिरावीत.
- आता त्यामध्ये गाजराचा कीस, खसखस, लाल तिखट किंवा मिरपूड, मेयोनेझ, दही, साखर आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व जिन्नस एकत्र करावेत व चार तास कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवावी.
- थंडगार गाजर द्राक्षे कोथिंबीर तयार आहे.
शक्यतो पांढर्या भांड्यात किंवा केळीच्या पानावर ठेवून टेबलावर न्यावी.
जीवनशैली पाककला