बाजरी पीठाच्या चकल्या - पाककृती

बाजरी पीठाच्या चकल्या, पाककला - [Bajari Pithachya Chakalya, Recipe] थंडीच्या दिवसात बाजरी आपल्या शरीराला उपयुक्त असते. अश्यावेळी चटपटीत, खुसखुशीत अश्या ‘बाजरीच्या पिठाच्या चकल्या’ बनवून सर्वांना खुश करू शकता.
बाजरी पीठाच्या चकल्या- पाककला | Bajari Pithachya Chakalya - Recipe

चटपटीत, खुसखुशीत बाजरी पीठाच्या चकल्या

‘बाजरी पीठाच्या चकल्या’साठी लागणारा जिन्नस

 • २ वाट्या बाजरीचे पीठ
 • १ चमचा तिखट
 • चवीनुसार मीठ
 • चिमुटभर हिंग
 • पाव चमचा हळद
 • अर्धा चमचा ओवा
 • तळण्यासाठी तेल
 • आवश्यकतेनुसार पाणी

‘बाजरी पीठाच्या चकल्या’ची पाककृती

 • सर्वप्रथम बाजरीचे ताजे पीठ चाळून घ्या.
 • पीठामध्ये चवीनुसार तिखट, मीठ, चिमुटभर हिंग, हळद, ओवा व कडकडीत तेलाचे मोहन घालून कढत पाण्यात भिजवा.
 • साधारण पाच मिनिटे झाकण ठेवून द्या.
 • पीठ एका परातीत काढून पाण्याने किंवा तेलाने चांगले मळून घ्या.
 • मध्यम आकाराचे लांबट गोळे बनवून चकलीच्या भांड्यात टाका.
 • नेहमी प्रमाणे चकल्या बनवतो त्याप्रमाणे बाजरी पीठाच्या चकल्या बनवा आणि गरमागरम तळून खा.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.