कडबोळी - पाककृती

कडबोळी, पाककला - [Kadboli, Recipe] बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टिक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग महाराष्ट्रीयन ‘कडबोळी’ची पाककृती खासकरुन दिवाळीला बनवली जाते.
कडबोळी- पाककला | Kadboli - Recipe

कुरकूरीत आणि खमंग ‘कडबोळी’

‘कडबोळी’साठी लागणारा जिन्नस

 • २ वाट्या कडबोळ्याची भाजाणी
 • दीड चमचा मीठ
 • अर्धा चमचा हळद
 • अर्धा चमचा हिंग
 • २ चमचे लाल तिखट
 • २ चमचे धणे पूड
 • १ चमचा जिरे पूड
 • १ चमचा ओव्याची पूड
 • पाव वाटी तीळ
 • ४०० ग्रॅम तेल

‘कडबोळी’ची पाककृती

 • भाजाणीत अर्धी वाटी गरम तेल, मीठ, हळद, हिंग, तिखट, धणे पूड, जिरे पूड, ओव्याची पूड आणि तीळ घालून पीठ चकलीच्या भाजाणीप्रमाणे भिजवावे.
 • पीठ मळून थोडावेळ ठेवावे.
 • थोड्यावेळानंतर हाताने चकलीप्रमाणे छोटी छोटी भुईचक्राएवढी कडबोळी करून मंद आचेवर कुरकुरीत तळावीत.


कडबोळी १०-१५ दिवस छान टिकतात.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.