संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम गाथेतील अभंग ४, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशशिकळा लोपलिया
तुकाराम गाथा - अभंग ४
राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें ।
सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा ।
घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा ।
तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥
- संत तुकाराम
तुकाराम गाथा - अभंग ४
तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा #तुकाराम गाथाअभिव्यक्ती / विचारधन
- [col]