Loading ...

शाळेच्या वेळेत - मराठी कविता

शाळेच्या वेळेत, मराठी कविता - [Shalechya Velet, Marathi Kavita] गलक्याने मुले येतात चहुबाजूने, ठरवून यावीत तशी, आणि नेटावे टांगतात आकाशाला वर.

गलक्याने मुले येतात चहुबाजूने, ठरवून यावीत तशी, आणि नेटावे टांगतात आकाशाला वर

गलक्याने मुले येतात चहुबाजूने
ठरवून यावीत तशी
आणि नेटावे टांगतात आकाशाला वर
मैदान साफ करून त्यांना खेळायचे आहेत खेळ
शाळेच्या वेळेत.
दप्तरं ठेवली आहेत त्यांनी आकाशाखाली झाकून
संतोष चांगला खेळतो म्हणून त्याला
घेत नाहीत खेळायला.
त्याचा खेळ कोणीसुद्धा पाहिला नाही अद्याप
तो उभा राहतो सरबताच्या गाडीजवळ
शाळेच्या वेळेत
बाजूचा सर्कस तंबू
मुख्याध्यापकांसारखा उभा आएह नजर रोखून
त्याकडे मुलांचे लक्षच नाही
मुले खेळताहेत खेळ
शाळेच्या वेळेत.
सूर्याला टोलवून संध्याकाळ देते
शाळा सुटल्याची बेल
मुळे पांगतात घराच्या दिशेने
पुस्तकांच्या मैदानातून परतल्यासारखी
निघताना आकाशाला सामुदायिकपणे
सैल करतात मैदानावर पालकांचा धाक हरवलेली दप्तरं
आकाशाखाली झाकून राहतात रात्रभर.
पहाटे सर्कसचा तंबू हलवताना
आकाशही गुंडाळून नेले जाते दुसऱ्या शहरात
आणि छातीला लावलेल्या ओळखपत्रासारखी
दप्तरे पोरकी होतात मैदानावर
शाळेच्या वेळेत


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची