चित्रात दिसावे तसे हे शहर, विस्कटलेले, आणि फुलांची नदी बाजूबाजूने
चित्रात दिसावे तसे हे शहरविस्कटलेले
आणि फुलांची नदी बाजूबाजूने.
मी नदी ओलांडून येतो,
सुगंधित न होता
स्वप्नांचे हिशेब तपासत
तू उभी आहेस
कुठल्याशा अनाम वळणावर.
आपल्यातल्या वाढत चाललेल्या अंतरावरून
मी तडक निघतो तु पडताळून पाहतेस.
पुन्हा पुन्हा आणि
नकाराच्या लगामाने
हुसकावून लावतेस
शुभ्र स्वप्नांचा थवा.
माझ्याही स्थलांतराचा
एवढाच संकेत
दिवसांच्या चिमटीत
सूर्य जायबंदि होयापूर्वीचा