मनाच्या तळाशी - मराठी कविता

मनाच्या तळाशी, मराठी कविता - [Manachya Talashi, Marathi Kavita] मनाच्या तळाशी, एक राजा एक राणी.

मनाच्या तळाशी, एक राजा एक राणी

मनाच्या तळाशी
एक राजा एक राणी
तवंग आईचा
मुलगी उताणी

मनाच्या तळाशी
साचत राहते
आई आंबट
मुलगी खारट
राजा राणी
तिरकस तुरट

मनाच्या तळाशी
आई गायब
आटल्या दुधावर
राणी नायक

करपट नातं
जोजवत राहतो
राजा आपला उशाशी
मेल्या मनाच्या तळाशी


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.