Loading ...

मी खूप दमलोय - मराठी कविता

मी खूप दमलोय, मराठी कविता - [Me Khup Damloy, Marathi Kavita] मी खूप दमलोय, कोणी तरी मला सुखाची गोष्ट सांगा.

मी खूप दमलोय, कोणी तरी मला सुखाची गोष्ट सांगा

मी खूप दमलोय
कोणी तरी मला सुखाची गोष्ट सांगा. मला मान्य आहे.
ह्या शहराचा नागरीक म्हणून
तुम्ही बहाल केलीय ही दमछाक.
पण मी विश्रांती घेतो सिग्नल जवळ
काही सेकंद. त्याचीही नोंद होतेय तुमच्या मोबाईलवर
हे तितकेसे अन्यायकारक आहे माझ्यावर
मी यानाने अवकाशात गेलो तर
मला विश्रांती मिळेल का?
अंगावरचे कपडे उतरवले तर
मला मोकळं वाटेल का?
मी इतका खचलोय तरी मला
झोप का येत नाही?
कृपया कोणीतरी मला सुखाची गोष्ट सांगा?
लहानपणी दुःखाची गोष्ट ऐकली म्हणून
धावलो पाटी फुटेस्तोवर अक्षरांच्या मागे
म्हणून मी दमलो असेन. आता संपूर्ण कोसळून
पडण्यापूर्वी येऊ दे वारा तुमच्या पिचक्या स्ट्रॉ मधून भसाभसा
भिरभिरू दे नात्यानात्यांची पवनचक्की
शक्य तेवढ्या जोमात.
फ्रंटवर घासू दे बेडक माझी छाती प्रिय शत्रूंसाठी
जमल्यास रेस्ट हाऊसमध्ये लावा
माझा फोटो, घाम निपटतानाचा.
तुमच्या जगण्याचे निकषच किती खरे.
तुम्हाला टिव्हीवरच्या टापांचे आवाज ऐकून धापा लागतात आणि मी तर कवितेच्या
कुसाखालीच उभा आहे.
आता तरी मला सुखाची गोष्ट सांगा?
शेवटची म्हणून का होईना, सांगाल ना?


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची