समजू या की - मराठी कविता

समजू या की, मराठी कविता - [Samaju Ya Ki, Marathi Kavita] मी अपराध केलाय, कविता लिहून.

मी अपराध केलाय, कविता लिहून

मी अपराध केलाय
कविता लिहून
आणि तुमच्या पुढ्यात
सफाई करण्यासाठी
शब्द सोलून ठेवलेत.
तरीही तुम्ही विचारता?
कविता कुठाय
मी म्हणतो
तुम्ही तरी तुम्ही कुठाय?
तुम्हाला टण टण उड्या मारणारा
इतिसाहाचा बेडूक हवा असतो
किंवा
हिरव्यागार चाऱ्यावर पोसलेली शेळी
जिच्या मानेवरील सुरी होण्याचं
पसंत करता तुम्ही
तुम्हाला थेट मोकळं आभाळं हवई असतं.
हव्या त्या रंगाचं..
मी मात्र तडाजोड केली तर
तो माझ दुसरा अपराध ठरतोय.
तेव्हा माफ करा मित्रांनो.
तुम्ही पुरते वितळून गेलाहात
हिवाळ्यातल्या सावलीत
आणि
मी दुपार कवितेतल्या कोणत्याही
ऋतुसाठी राखून ठेवलेली


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

1 टिप्पणी

  1. खूपच सुंदर आहे कविता
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.