Loading ...

लेखकाला आलेलं कुणाचंही पत्र - मराठी कविता

लेखकाला आलेलं कुणाचंही पत्र, मराठी कविता - [Lekhakala Alel Kunachahi Patra, Marathi Kavita] कोणत्याही दुपारी कुणाचंही पत्र येतं रंगीत कव्हर वालं, पत्र मिळताच त्यावर तुटून पडतात, भुकेल्या नजरेने लेखकाच्या घरातले सर्व.

कोणत्याही दुपारी कुणाचंही पत्र येतं रंगीत कव्हर वालं, पत्र मिळताच त्यावर तुटून पडतात, भुकेल्या नजरेने लेखकाच्या घरातले सर्व

कोणत्याही दुपारी कुणाचंही पत्र येतं रंगीत कव्हर वालं
पत्र मिळताच त्यावर तुटून पडतात
भुकेल्या नजरेने लेखकाच्या घरातले सर्व
आई, बहीण, बायको, काकी नी चुलतभाऊ इत्यादी
लेखक दमून येतो पत्रासारखा प्रवासातून
तेव्हा टि. व्ही. वर आजार बळावलेल्या माणसासारखं
पडून असतं पत्र
लेखकाच्या आधीच इतरांनी वाचून आकसून गेलेलं
असते ते लेखकासारखं
आईला वाटतं, मुलाचं कौतुक दडलंय त्यात
बायकोला वाटतं, नवऱ्याचं लफडं अडलंय त्यात
बहिणीला वाटतं, किती दूरदूर आपल्या भावाचा वावर!
मुलीला वाटतं, ई हे तर रंगीत कव्हर!
काकीला वाटतं, दुपारी वाचू पडल्या पडल्या
आईला वाटतं, चेक असेल तर रेशन सुटेल वेळेला अडत्या
लेखक बिखक तसं काही नसतं घरच्यांना
थोडं समाधान हेच जोडलेलं
लेखकाच्या वाट्याला असंच येतं का सारं
त्याच्या आधी फोडलेलं?


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची