किती काळ चाललो - मराठी कविता

किती काळ चाललो, मराठी कविता - [Kiti Kal Chalalo, Marathi Kavita] किती काळ चाललो तुझे बोट धरून, इतका की, तुझ्या सानिध्याच्या संधिप्रकाशात थकून गेलोय मी.

किती काळ चाललो तुझे बोट धरून, इतका की, तुझ्या सानिध्याच्या संधिप्रकाशात थकून गेलोय मी

किती काळ चाललो तुझे बोट धरून
इतका की, तुझ्या सानिध्याच्या संधिप्रकाशात थकून गेलोय मी
मला उमजते ते सत्य असते,
म्हणून न उमजणारं काहीही असत्य मानतो मी
असं की,
तू साऱ्या विश्वाच्या शोकाची सुरुवात
आणि मी नकाराची भांग पचवून विश्वाला पाठमोरा
एवढ्याने तुझेमाझे प्रश्न सुटणार नाहीत

ओढलेलं तुटू नये असं
आपण कोणतं रसायन
ह्या भाषेच्या वाळवंटात खितपत?


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.