बापाने दिवा लावला तेव्हा, घर कोसळेल असं वाटलं नाही, घर कोसळले पण, बापाचे म्हणणे, दिवा लावल्यामुळे नाही
बापाने दिवा लावला तेव्हाघर कोसळेल असं वाटलं नाही
घर कोसळले पण
बापाचे म्हणणे
दिवा लावल्यामुळे नाही
त्याने काही कारणे पुढे केली
थातूर मातूर
भिंतीवर खिळे अधिक होते
पावसाच्या दिशेने घर बांधले असताना
पाऊस पडलाच नाही
पूर्वीच्या भाडेकरूंनी जाताना
घर पोखरले होते
जमिनीला छताचे आकर्षण असावे
इत्यादि. इत्यादी.
हे असे असले तरी
मी कधी पाहिलेच नाही
घराला छत होते ते
आणि घरी परतलो नाही
दिवा विझण्यापूर्वी
घर आईने सांभाळायचं म्हणून
कोसळणंही तिनेच थोपवायचं
यावर आमचं एकमत झालं
असो
कदाचित
आईच्या काळजात थोडं हललं असेल
नवऱ्याविषयी / मुलाविषयी आणि घराविषयी