Loading ...
/* Dont copy */

लोहगड किल्ला

लोहगड किल्ला - [Lohagad Fort] लोहगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील लोहगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

लोहगड किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते.

लोहगड किल्ला - [Lohagad Fort] लोहगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील लोहगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावरील मळवली स्थानकापासून सुमारे ८ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. रेल्वेस्थानकाच्या फलाटावर लोहगड विसापूर या जोडकिल्ल्यांची रेल्वेने मुळी पाटी लावून जाहिरातच केलेली आहे. त्यावर लिहिलयं -“लोहगड, विसापूर फोर्ट-किल्ले.”

मळवली स्थानकबाहेर पडल्यानंतर नव्या द्रुतगती महामार्गावरील पुल ओलांडून पलिकडे जावे. साधारण अर्ध्या तासाच्या वाटचालीनंतर भाजे गाव येते. येथून एक पायऱ्यांचा मार्ग भाग्याच्या लेण्यांकडे जातो. तर दुसरी गाडीवाट लोहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या लोहगावाकडे जाते. लोहगावातून लोहगडाची तटबंदी आणि बुरूज लक्ष वेधून घेतात. चढायला सोपा असा हा दुर्ग सहजपणे काबीज करता येतो. गडावर एक सुंदर स्वच्छ पाण्याचे टाके आहे. यात रंगीबेरंगी मासेही आहेत.

पवणामावळात असणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचा संरक्षक असणारा हा लोहगड पुणे-मुंबई हमरस्त्यावरून सहजच नजरेस पडतो. पुणे आणि मुंबईपासून जवळ असल्या कारणाने येथे ट्रेकर्स मंडळीची नेहमीच ये जा चालू असते. किल्ल्याच्या पोटात भाजे आणि बेडसे या प्रसिद्ध लेण्या आहेत. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. महामार्गापासून जवळच असल्याने पायथ्याच्या गावात सर्व सुखसुविधा आहेत.

लोहगड किल्ल्याचा इतिहास


लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड-विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती.

इ.स. १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगऱ्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला. शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू - नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुऱ्यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

लोहगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते.

गणेश दरवाजा: ह्याच्याच डाव्या - उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.

नारायण दरवाजा: हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई.

हनुमान दरवाजा: हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.

महादरवाजा: हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले.

महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथऱ्यात बसवलेली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभ उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीत राहाण्याची सोय होते. या कोठीत अनेक खोल्या आढळतात. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. जिथे एक सुंदर शिवमंदिर आढळते. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. ते तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळं सोळाकोनी आहे.

मोठ्या तळ्याच्या पुढे विंचुकाट्याकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. या विंचूकाट्यास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजुबाजुच्या परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेण्या आवर्जून पाहव्यात. पावसाळ्यातील लोहगडाचे रुप पाहिले की मनोमनी गुणगुणतं...

ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी ।
आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी ॥

लोहगड गडावर जाण्याच्या वाटा


लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.

पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणाऱ्या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे. तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे. त्याचे नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो. या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.

लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडी पर्यंत जाता येते. पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो. तेथून ३ ते ४ कि.मी अंतरावर लोहगडवाडी आहे. उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत. साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे. मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून ट्रॅक्सीने जाता येते मात्र ट्रॅक्सभाडे १००० रु. आहे.

काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो. पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेकडीवर जातो. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.

लक्ष्मी कोठी राहण्याची एकमेव सोय आहे. ३० ते ४० जण आरामात राहू शकतात. आपण स्वतः जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्ये जेवणाची सोय होते. बारामही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी २ तास लागतात.

लोहगड किल्ल्याचे फोटो



मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,15,अनुरथ गोरे,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1199,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,31,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,3,अरुण कोलटकर,1,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,957,आईच्या कविता,22,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आदित्य कदम,1,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,24,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,17,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,48,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,66,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,78,कवी अनिल,1,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,2,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,3,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगुळकर,4,ग दि माडगूळकर,1,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,11,गोड पदार्थ,56,गौतम जगताप,1,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,427,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,56,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,73,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,58,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,नमिता प्रशांत,1,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,9,निवडक,4,निसर्ग कविता,25,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,31,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,12,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,14,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,16,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,93,प्रेरणादायी कविता,16,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,3,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,9,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,3,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,16,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास धोत्रे,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,102,मराठी कविता,820,मराठी कवी,2,मराठी गझल,25,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,40,मराठी चित्रपट,15,मराठी टिव्ही,47,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,42,मराठी मालिका,18,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,44,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,87,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,158,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,308,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश बिऱ्हाडे,6,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,17,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,10,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,6,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,22,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,8,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,रामकृष्ण जोशी,1,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वसंत बापट,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,56,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,6,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,48,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,11,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष महाशब्दे,9,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,31,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,10,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,132,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,4,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,19,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,317,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,40,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: लोहगड किल्ला
लोहगड किल्ला
लोहगड किल्ला - [Lohagad Fort] लोहगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील लोहगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
https://1.bp.blogspot.com/-M25ERqXuzjE/XZls9O7dTaI/AAAAAAAAEcE/uKfRz6JlZqI9OH9t0ADlVuA-H19ZuRIRwCLcBGAsYHQ/s1600/lohagad-fort.jpg
https://1.bp.blogspot.com/-M25ERqXuzjE/XZls9O7dTaI/AAAAAAAAEcE/uKfRz6JlZqI9OH9t0ADlVuA-H19ZuRIRwCLcBGAsYHQ/s72-c/lohagad-fort.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2004/07/lohagad-fort.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2004/07/lohagad-fort.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची