Loading ...

कोरीगड-कोराईगड किल्ला

कोरीगड-कोराईगड किल्ला - [Korigad Fort] ३००० फुट उंचीचा कोरीगड-कोराईगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील कोरीगड-कोराईगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

कोरीगड-कोराईगड किल्ला - Korigad Fort

लोणावळा आणि पाली यांच्याकडे असणाऱ्या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे

कोरीगड-कोराईगड किल्ला - [Korigad Fort] ३००० फुट उंचीचा कोरीगड-कोराईगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील कोरीगड-कोराईगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. लोणावळ्याच्या दक्षिणेला सहज जाता येण्यासारखा हा किल्ला. घाटमाथ्यावर असल्यामुळे एकाच वेळी कोकण व देशावरील परिसराने विस्तृत दर्शन घडते. तीन हजार फूट उंचीच्या किल्ल्यावर कोराईदेवीचे मंदिर व मोठे तळे पहाण्यासारखे आहे.

बुरुजावरुन कोकणातील मुलुखाचे विहंगम दृश्य दिसते. मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे त्याचे नाव आहे कोरबारस मावळ. याच मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. लोणावळा आणि पाली यांच्याकडे असणाऱ्या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सद्यःस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे या भागातील किल्ले पहावयाचे असल्यास तीन ते चार दिवसांची सवड हवी. कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड या सारखा सुंदर ट्रेकही या भागात आपल्याला करता येतो.

कोरीगड-कोराईगड किल्ल्याचा इतिहास


कोरीगड-कोराईगडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही. १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग-तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला. गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली. या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही ही इंग्रजांना मिळाला.

कोरीगड-कोराईगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


पेठ-शहापूर गावातून कोराईगड एका भिंतीसारखा भासतो. गडमाथा म्हणजे एक भलेमोठे पठारच आहे. गडाची तटबंदी साधारणतः दीड किलोमीटर लांबीची आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरा घालता येतो. पेठ-शहापूरच्या वाटेने वर येताना मार्गात अनेक गुहा व पाण्याची टाके आणि श्री गणेशाची मूर्ती लागते.

गणेशदरवाज्याने अर्थात पेठ शहापूरच्या वाटेने वर आल्यावर समोरच वाड्यांचे अवशेष आढळतात. समोरच पठारावर दुरवर कोराईदेवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे. कोराईदेवीच्या मूर्तीची उंची साधारणतः चार फूट आहे. गडावर दक्षिणेकडच्या बाजूस अनेक बुरूज आहेत. गडावर आजही सहा तोफा आहेत. त्यापैकी सर्वात मोठी ‘लक्ष्मी’ तोफ कोराईदेवीच्या मंदिराजवळ आहे.

याचप्रमाणे गडावर आणखी दोनमंदिरे आहेत. गडावर दोन विस्तीर्ण तळी आहेत. तळ्यांच्या पुढे आणखी दोन गुहा आहेत. येथेच शंख-चक्र-गदा-पद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे. गडावरून समोरच नागफणीचे टोक, तुंग, तिकोना, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा आणि माणिकगड असा सर्व परिसर दिसतो.

कोरीगड-कोराईगड गडावर जाण्याच्या वाटा


सद्यःस्थितीला गडावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत.

पेठ-शहापूर: कोरीगडला जाण्यासाठी लोणावळ्याला यावे. येथून आय. एन. एस. शिवाजीमार्गे आंबवणे किंवा भांबुर्डेला जाणारी बस पकडावी किंवा सहारा प्रकल्पाकडे जाणारी बस पकडावी आणि भुशी धरणाच्या पुढे, आय.एन.एस. शिवाजीच्या पुढे २२ कि.मी वरील पेठ-शहापूर गावात उतरावे. या गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला पायऱ्यांशी घेऊन जाते. पायऱ्यांच्या साहाय्याने वीस मिनिटांत गडावर पोहचता येते.

आंबवणे गाव: कोरीगडला जाण्यासाठी आंबवणे गावातूनही जाता येते. ही वाट मात्र जरा अवघड आहे. या वाटेने जाण्यासाठी लोणावळ्याहून भांबुर्डेकडे अथवा थेट आंबवणेकडे जाणारी बस पकडावी. गावातून अर्ध्या तासात गडावर जाता येते.

गडावरील मंदिरात राहण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वतःच करावी. गडावर पाण्याची सोय नाही, गडावर दोन तळी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पेठशहापूर मार्गे गडावर येणाऱ्या वाटेवर दरवाजाच्या अलीकडे एक टाके आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हे वापरावे. गडावर जाण्यासाठी पेठशहापूर मार्गे अर्धा तास लागतो.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

  1. छत्रपती शिवरायांच्या सर्व किल्ल्यांची सखोल ऎतिहासिक माहिती दिल्यास आनंद होईल.
    आपण दिलेल्या सर्व किल्ल्यांच्या माहितीबद्दल आभारी आहोत.

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची