दुर्ग - ढाकोबा किल्ला - [Durg Dhakoba Fort] ४१०० फुट उंचीचा दुर्ग - ढाकोबा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर डोंगररांगेतील दुर्ग - ढाकोबा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
नाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे एक उत्तुंग पर्वत रांग दिसून येते. त्यामध्येच एक डोंगर म्हणजे ‘ढाकोबा’ किल्ल्याची एक बाजू म्हणजे सरळसोट सुटलेला कडा.
दुर्ग - ढाकोबा किल्ला - [Durg Dhakoba Fort] ४१०० फुट उंचीचा दुर्ग - ढाकोबा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर डोंगररांगेतील दुर्ग - ढाकोबा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. नाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे एक उत्तुंग पर्वत रांग दिसून येते. त्यामध्येच एक डोंगर म्हणजे ‘ढाकोबा’ किल्ल्याची एक बाजू म्हणजे सरळसोट सुटलेला कडा. तो सरळ खाली कोकणातच उतरतो. याच ढाकोबाच्या सरळ रेषेत असणारा दुसरा किल्ला म्हणजे ‘दुर्ग’ दुर्गमता आणि विरळवस्ती हे या भागाचे वैशिष्ट्य. येथे ग्रामस्थांची आपल्या प्राथमिक गरजा भागवतांनाच मारामार होते तर वीज-शिक्षण तर दूरच येथील मुख्य व्यवसाय शेती काही ठिकाणी दुधाचा व्यवसाय पण केला जातो.दुर्ग - ढाकोबा किल्ल्याचा इतिहास
दुर्ग - ढाकोबा या दोन्ही गडावर गड किल्ला असण्याचे कोणतेही अवशेष नाहीत. मात्र टेहळणीसाठी यांचा उपयोग केला जात असावा. ढाकोबा किल्ल्यावरून नाणेघाट जीवधनची मागची बाजू, दाऱ्याघाट असे कोकणचे विहंगम दृश्य दिसते.
दुर्ग: दुर्गादेवीच्या मंदिरापासून किल्ल्यावर पोहचण्यास २० मिनिटे लागतात. येथून गोरखगड, सिद्धगड आणि मच्छिंद्रगड असा सर्व परिसर दिसतो.
दुर्ग - ढाकोबा किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे
जुन्नर - आपटाळे - आंबोली मार्गे येणाऱ्या वाटेने प्रथम ढाकोबा आणि नंतर दुर्ग करता येतो. भीमाशंकर-अहुपे मार्गे येणाऱ्या वाटेने प्रथम दुर्ग आणि नंतर ढाकोबा करता येतो.
जुन्नर - आपटाळे - आंबोली मार्गे: जुन्नर वरून आंबोली गावात येण्यासाठी थेट बस आहे हे अंतर साधारण दीड तासाचे आहे. आंबोली गावातूनच ढाकोबाचे दर्शन होते. गावातून एक वाट सरळ समोरच्या पठारावर जाते. वर जातांना वाटेत तीन गुहा लागतात. गावापासून पठारावर येण्यास दीड तास पुरतो या वाटेतूनच एक वाट मध्ये उजवीकडे दुभागते ती दाऱ्याघाटा कडे जाते. एकदा पठारावर पोहचल्यावर अनेक ढोरवाटा लागतात. पण त्यामध्ये ठळक मात्र दोनच वाटा आहेत त्यातील दोनच वाटा आहेत. त्यातील एक वाट डावीकडे जाते तर दुसरीवाटा उजवीकडे थेट धाकोबाच्या पायथ्यालगत पुढे जाते आणि पुन्हा ५ मिनिटांनी डावीकडे डोंगरधारेवरून खाली उतरते हीच वाट पुढे दुर्गकडे जाते. ही वाट ज्या ठिकाणाहून खाली वळते तेथूनच एक वाट सरळ डोंगरावर म्हणजेच धाकोबावर जाते. येथून गडमाथा गाठण्यास अर्धा तास पुरतो.
भीमाशंकर - अहुपे मार्गे: वर सांगितलेल्या दुर्गकडे जाणाऱ्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक वाट डावीकडे जंगलात वळते. ती धाकोबाच्या मंदिराकडे जाते तर सरळ जाणारी वाट पुढे अर्ध्या तासात एका ओढ्यापाशी येऊन थांबते. या ओढ्याला बारामाही पाणी असते. याच वाटेने पुढे हातवीजच्या मार्गे निघायचे. थोडे फार चढउतार आहेत वाटेला अनेक उपवाटा फुटलेल्या आहेत पण आपण ठळक वाट सोडायची नाही. पुढे एक तासाच्या चालीनंतर दुर्ग किल्ल्याचे दर्शन होते. पुढे एका पठारावर येऊन वाट दुभागते. डावीकडे जाणारी वाट हातवीज आणि दुर्गवाडीकडे जाते तर उजवीकडे जाणारी वाट दुर्गादेवीच्या मंदिरात जाते. येथून दुर्गादेवीच्या मंदिरात जाण्यास अर्धा तास पुरतो. दुर्गादेवीच्या मंदिरापासून किल्ल्यावर जाण्यास ठळक वाट नाही. वाट आपणच आपली शोधून काढायची.
दुर्ग - ढाकोबा गडावर जाण्याच्या वाटा
दुर्ग - ढाकोबा किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची असून दुसरी वाट गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी दगडात पायऱ्या कोरून बांधून काढलेली आहे. कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडस्र या गावी यावे लागते. जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाड यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरामधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते.
खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात आपण बुरूजापाशी येऊन पोहचतो. येथून सोपे कातळरोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. वाटेतच डोंगरकपारीत पाण्याची दोन टाकी आढळतात. दुसऱ्या वाटेने म्हणजे या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणाऱ्या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. येथून शंभर ते दीडशे पायऱ्या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे. येथून किल्ल्यावर जाण्यास एक तास पुरतो.
राहण्याची सोय किल्ल्यावर नाही. धाकोबाच्या पायथ्याशी असणाऱ्या मंदिरात १५ जणांची राहण्याची सोय होते. दुर्गच्या पायथ्याशी असणाऱ्या दुर्गामंदिराच्या मंदिरात ५ जणांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. ढाकोबा आणि दुर्गादेवीच्या मंदिरात बाजूलाच पिण्याच्या पाण्याची तळी आहेत.
अभिप्राय