Loading ...

अकराव्या दिशेने वाहणारा गारवा - मराठी कविता (हर्षद खंदारे)

मराठीमाती डॉट कॉमचे निर्माते-मुख्य संपादक, लेखक आणि कवी हर्षद खंदारे यांची अकराव्या दिशेने वाहणारा गारवा ही मराठी कविता.

अकराव्या दिशेने वाहणारा गारवा - मराठी कविता (हर्षद खंदारे)

प्रेमातील प्रतीक्षा, आशा आणि आत्मसमर्पणाच्या शक्यतेचा कोमल प्रश्न विचारणारी ही कविता आहे...

अकराव्या दिशेने वाहणारा गारवा

हर्षद खंदारे (मराठीमाती डॉट कॉमचे निर्माते-मुख्य संपादक)

प्रस्तावना
ही कविता प्रेमाच्या शक्यतेभोवती फिरणारा एक सातत्यपूर्ण, हळवा प्रश्न आहे. कवी ‘हिरवळ’ होऊन प्रियकराच्या स्वप्नांत यायची इच्छा व्यक्त करतो, तर प्रतीक्षेचे प्रतीक म्हणून आषाढघन, काळी माती आणि सजणारे आभाळ यांसारख्या प्रतिमा वापरतो. सहवास ओझरता असला तरी तळहातांवर तळहात पेरण्याची आकांक्षा आणि रात्र वितळेपर्यंत स्वप्नं गोळा करण्याची धडपड ही आत्मीयतेची तीव्रता दाखवते. शेवटी ‘रातराणी’ आणि ‘रानवारा’ या रूपकांतून प्रेमातील ओळख, अस्तित्व आणि स्मरण यांची नाजूक जाणीव प्रकट होते. संपूर्ण कवितेत पुनरुक्त होणारा “हे शक्य आहे का?” हा प्रश्न आशा आणि अनिश्चिततेच्या दरम्यान झुलणाऱ्या मन:स्थितीचे प्रभावी चित्र उभे करतो.
कवी: हर्षद खंदारे • सादरकर्ते: हर्षद खंदारे

तांबूस पिवळ्या तुझ्या स्वप्नांत मी हिरवळ होऊन यावं, हे शक्य आहे का? काळजात आषाढघन माळून, काळ्या मातीत तू वाट बघत बसावं, आभाळ सजेपर्यंत — सांग, हे शक्य आहे का? अकराव्या दिशेने वाहणारा गारवा तू मंजुळ सरींनी भिजवून टाकावा, आणि मी अंगणात विखुरलेली स्वप्नं गोळा करण्याचा प्रयत्न करावा, रात्र वितळेपर्यंत! सांग ना, हे शक्य आहे का? ओझरत्या या सहवासात मी पेरावे हे तळहात तुझ्या तळहातांवर, काठोकाठ, आणि तू डोळे बंद करावेस माझ्या पाठोपाठ — सांग आता, हे शक्य आहे का? चांदण्यांची लगबग सुरू होईल पुन्हा; पुन्हा नवे सूर्य झळकतील. तू होशील पुन्हा रातराणी नव्याने! पण तुझा गंध माळणारा रानवारा मीच असेन ना? सांग ना, सांग आता — हे शक्य आहे का? तांबूस पिवळ्या तुझ्या स्वप्नांत मी हिरवळ होऊन यावं — हे शक्य आहे का?

अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची