Loading ...
/* Dont copy */

तो कुणाचा गुलाम नाही! - मराठी कविता (नरेश रावताला)

मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे नोंदणीकृत सभासद कवी नरेश रावताला यांची ‘तो कुणाचा गुलाम नाही!’ ही मराठी कविता.

तो कुणाचा गुलाम नाही! - मराठी कविता (नरेश रावताला)

कवी नरेश रावताला लिखित ‘तो कुणाचा गुलाम नाही!’ ही कविता मानवी स्वार्थामुळे धोक्यात आलेल्या ‘प्राणवायू’ (ऑक्सिजन) या निसर्गदत्त घटकाचे महत्त्व अधोरेखित करणारी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन करणारी एक प्रबोधनात्मक गद्य-कविता आहे...

तो कुणाचा गुलाम नाही!

नरेश रावताला (धुळे, महाराष्ट्र)

प्रस्तावना
प्रस्तुत ‘तो कुणाचा गुलाम नाही!’ या कवितेचे भावविश्व हे समकालीन मानवी जीवन, राजकीय-सामाजिक कोलाहल आणि त्या पार्श्वभूमीवर निसर्गाचे होणारे मूक शोषण यांच्या संदर्भाने विणलेले आहे. मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी उभ्या केलेल्या कृत्रिम जगातील भ्रष्टाचार, दंगली, आंदोलने आणि सत्तेची चढाओढ यापासून निसर्गाचा हा मूलभूत घटक कसा अलिप्त आहे, याचे विस्तृत चित्रण सुरुवातीला येते. कवीने आधुनिक कालखंडातील कोरोना महामारीच्या भीषण वास्तवाचा संदर्भ देऊन निसर्गाच्या या निशःब्द देणगीची किंमत न कळणाऱ्या मानवी वृत्तीवर कठोर बोट ठेवले आहे. तांत्रिक प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेला माणूस आपल्या जगण्याचा मुख्य आधार विसरत चालल्याची खंत या कवितेच्या आशयाच्या केंद्रस्थानी आहे.

“मुझे बर्बाद करने निकले हैं, और किसे बर्बाद करोगे? भूल न जाना आज के दिन को, एक दिन मुझे याद करोगे।” तो कुणाच्या अधीन नाही. त्याला कशाचीच पर्वा नाही. ना कोणी त्याला रोखू शकतं, ना दम देऊ शकतं. तो पूर्णपणे निर्धास्त आहे. त्याच्यावर कुणाची हुकूमत नाही. निर्विकार, निःधर्मी, अमूर्त या त्याच्या मूलभूत गरजा. त्याच्यासाठी संप होत नाही, उपोषण होत नाही. कधी त्याचं समर्थन करत दगडफेक होत नाही. टायर जाळले जात नाहीत, बसच्या काचा फोडल्या जात नाहीत. रस्ते अडवले जात नाहीत. सरकारी किंवा खासगी कार्यालयांतील फर्निचर फोडलं जात नाही. ना त्याच्याविरुद्ध तलवारी नाचवल्या जातात, ना बंदुका निघतात. दुकाने बंद होणार नाहीत, ना बाजारपेठा. फटाक्यांची आतषबाजी होत नाही, ना आनंदोत्सव साजरे होतात. जाळपोळ, चेंगराचेंगरी काहीच नाही. त्याच्या चांगुलपणासाठी ना विशिष्ट रंगाचे ध्वज लागतात, ना विषमतेचा तोरा. बॉम्बस्फोट नाहीत, गोळीबार नाही. पोलिसांना ना लाठीमार करावा लागतो, ना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागतात. कुणाला अटक होत नाही, चौकशीचा ससेमिरा लागत नाही. त्याच्या कृतींसाठी चौकशी समिती नेमण्याची गरज नसते. अहवालांची प्रतीक्षा नसते. त्याच्यावर कोणाची मालकी नाही, म्हणूनच त्याला दुजाभाव कधीच मान्य नाही. त्याच्या दरबारात वादी आणि प्रतिवादी दोघांना पुराव्यानिशी न्याय मिळतो. तो सर्वांसाठी समान आहे. उसनं अवसान आणायची त्याला खोड नाही. तो कुणाचा वैरी नाही. सल्लागार नाहीत त्याच्याकडे. या झपाटलेल्या जगातही तो बेईमानी करू शकत नाही. त्याला भ्रष्टाचार, अत्याचार, निंदा-नालस्ती आणि वशिलेबाजी यांचा तिटकारा आहे. तो निष्कलंक आहे, म्हणून त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. कोर्ट-कचेऱ्यांपासून तो अलिप्त आहे. त्याला ना हुजरेगिरी करावी लागते, ना स्वतःची बढाई मारावी लागते, ना कोणावर टीका-टिप्पणी करावी लागते. त्याच्या रक्तातच प्रामाणिकपणा आहे. यामुळेच त्याला कधीच शिक्षा झालेली नाही. आजवर त्याने इमाने-इतबारे अवनी सांभाळली आहे. त्याच्यात अत्याचारांशी सामना करण्याचं धाडस आहे. स्वतःच्या विचारांवर तो ठाम आहे. कोणाचाही सल्ला नसूनही तो योग्य निर्णय घेतो. तो सार्वकालिक आहे, सार्वत्रिक आहे. कोणाच्या मालकीचा नाही— ना सरकारचा, ना खासगी संस्थेचा. तो सर्वांसाठी विनामूल्य, मुक्त आहे. कधीच कुणाच्या भावना त्याने दुखावल्या नाहीत. कुणाचाही अपमान केला नाही, कोणत्याही धर्माचे अपकीर्तन केले नाही. त्याचं प्रतिनिधित्व कुठल्याही धर्मप्रार्थनेतून होत नाही. त्याला प्रतीक नाही, दिशा नाही, मर्यादा नाही. त्याचं मोजमाप नाही. त्याची ख्याती अमाप आहे. कुणाकडून तो छदाम घेत नाही, लाच घेत नाही. त्यामुळे प्रत्येक सजीवाला तो श्वास घेण्याचा हक्क देतो. कोरोनाच्या लाटांत त्याने कित्येक जीव वाचवले... आज मात्र त्याचाच श्वास गुदमरतो आहे. जगण्यासाठी श्वास हवा आणि त्यासाठी प्राणवायू हवा. हा नैसर्गिक, प्रदूषणमुक्त, जीवनदायी वायू आज संकटात आहे. माणसाच्या अतिभोगाने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. पृथ्वी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. जंगले नष्ट केली, निसर्गावर घाला घातला... आणि वन्यजीव मानवी वस्त्यांमध्ये शिरले. वृक्षतोड झाली आणि निसर्गाचा समतोल ढासळला. आपण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अतिरेकी गर्जनेत रमून गेलो. त्या धबडग्यात प्राणवायूची निर्मितीच धोक्यात आली आहे. चॅटजीपीटी, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स या उंचीवर पोहोचलेल्या मानवजातीला आजही प्राणवायूचे संरक्षण करण्यासाठी पुढे येण्याची इच्छा नाही, ही खरी शोजनक शोकांतिका आहे. हे चित्र पालटावं लागेल. नाहीतर उद्या प्राणवायूसाठी युद्धं होतील. ऑक्सिजनच्या बाटल्यांसाठी प्रांत निर्माण होतील, सीमा आखल्या जातील. घराबाहेरचा शुद्ध प्राणवायू विकत घ्यावा लागेल. जसं आज पाण्याची बाटली विकत घेतो, तसं उद्या ऑक्सिजनचे फुगे आणि सिलिंडर बाजारात खरेदी करावे लागतील. त्याचेही गैरव्यवहार, तस्करी आणि काळाबाजार सुरू होतील. शासन यावर कायदे करेल, आणि तेच आपल्या आयुष्याचे नियमन करतील. याला आपणच थांबवलं पाहिजे. निसर्गावरचा अन्याय थांबवला पाहिजे. पर्यावरणप्रेमी आणि निसर्गमित्र एकत्र आले पाहिजेत. “झाडे लावा, झाडे जगवा” ही चळवळ खरी आचरणात आणली पाहिजे. वृक्षतोड थांबवली पाहिजे. वृक्षसंवर्धनात प्रत्येकाने पुधार घेतला पाहिजे. प्राणवायू वाचवायचा असेल, तर निसर्ग वाचवाच लागेल.

संपादकीय विश्लेषण
मध्यवर्ती कल्पना व भावगती ‘तो कुणाचा गुलाम नाही!’ या कवितेची मध्यवर्ती कल्पना ‘प्राणवायू’ या निसर्गाच्या सार्वभौम आणि नि:पक्षपाती रूपाभोवती फिरते. सुरुवातीला हा घटक मानवी मर्यादांच्या पलीकडे असलेला एक स्वतंत्र, न्यायप्रिय आणि निष्कलंक नायक म्हणून समोर येतो. कवितेची भावगती कौतुक आणि आदराकडून हळूहळू चिंता, भीती आणि शेवटी आवाहनाकडे सरकते. सुरुवातीच्या ओळींमध्ये तो कसा “सर्वांसाठी समान आहे” आणि “कुणाचा वैरी नाही” हे सांगत कवी त्याच्या मोठेपणाचा आलेख मांडतो; मात्र, उत्तरार्धात जेव्हा “आज मात्र त्याचाच श्वास गुदमरतो आहे” ही ओळ येते, तेव्हा कवितेचा टोन बदलतो आणि तिथे एक गंभीर चिंतातूर भाव निर्माण होतो. शैलीवैशिष्ट्ये आणि प्रतीकात्मकता कवितेची शैली ही प्रदीर्घ, संवादात्मक आणि काहीशी गद्यप्राय (Free Verse) आहे. कवीने ‘तो’ या सर्वनामाचा वापर करून प्राणवायूचे मानवीकरण (Personification) केले आहे. “त्याच्या दरबारात वादी आणि प्रतिवादी दोघांना पुराव्यानिशी न्याय मिळतो” अशा ओळींमधून निसर्गाच्या नि:पक्षपातीपणाचे सुंदर प्रतीक उभे राहिले आहे. मानवी समाजातील ढोंग, राजकीय आंदोलने, कोर्ट-कचेऱ्या आणि तंत्रज्ञानाचा अतिरेक (उदा. चॅटजीपीटी, कृत्रिम बुद्धिमत्ता) यांतील फोलपणा स्पष्ट करण्यासाठी कवीने उपरोधिक भाषेचा वापर केला आहे. परिणामकारकता कवितेचा शेवट अत्यंत प्रभावी आणि भविष्यकालीन संकटाची जाणीव करून देणारा आहे. जर आपण आताच बदललो नाही, तर “जसं आज पाण्याची बाटली विकत घेतो, तसं उद्या ऑक्सिजनचे फुगे आणि सिलिंडर बाजारात खरेदी करावे लागतील” हा कवीचा इशारा वाचकाला अंतर्मुख करतो. अगदी सुरुवातीला दिलेला उर्दू शेक आणि शेवटी “झाडे लावा, झाडे जगवा” या चळवळीचे केलेले आवाहन, यांमुळे ही कविता केवळ एक साहित्यिक कृती न राहता पर्यावरणाच्या रक्षणासाठीचे एक जाहीर प्रबोधनपत्र बनते. सारांश: ‘तो कुणाचा गुलाम नाही!’ ही कविता मानवी प्रगतीच्या आणि सामाजिक कोलाहलाच्या मर्यादा दाखवून देत, निसर्गाच्या निःशुल्क व जीवनदायी ‘प्राणवायू’चे जतन करण्यासाठी सामूहिक कृतीची तातडी अधोरेखित करते.
हर्षद खंदारे (निर्माते-मुख्य संपादक, मराठीमाती डॉट कॉम)
अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची