Loading ...
/* Dont copy */

मतदान कर बांधवा - मराठी कविता (प्रा. डॉ. विलास डोईफोडे)

मतदान कर बांधवा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी प्रा. डॉ. विलास डोईफोडे यांची मतदान कर बांधवा ही मराठी कविता.

मतदान कर बांधवा - मराठी कविता (प्रा. डॉ. विलास डोईफोडे)

विवेक, निष्ठा आणि निर्भयतेने मतदान करून लोकशाही बळकट करण्याचा सशक्त संदेश देणारी कविता...

मतदान कर बांधवा

प्रा. डॉ. विलास डोईफोडे (सावनेर, नागपूर, महाराष्ट्र)

ही कविता लोकशाहीतील मतदानाच्या कर्तव्याबाबत जागृती करणारी प्रबोधनात्मक रचना आहे. कवी नागरिकांना निर्भय, विवेकी आणि प्रामाणिकपणे मतदान करण्याचे आवाहन करतो. प्रलोभने, खोटी आश्वासने, अफवा आणि धर्म–जातीय राजकारण यांपासून दूर राहून अंतर्मनाच्या आवाजावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला आहे. विवेक, निष्ठा, बंधुभाव आणि सामाजिक एकतेच्या मूल्यांवर आधारित मतदानच लोकशाही मजबूत करू शकते, हे कवितेचे केंद्रस्थानी आहे.

या बांधवांनो मतदान करा रे, लोकशाही साठी अपुल्या, सोहळा हा संधीचा सोहळा. सर्व दिशांनी येईल आता प्रलोभनाला पूर, अशा अवेळी जाऊ नका रे इमानापासून दूर, अवती भवती फिरूदे सारे, निष्ठा मनी ठेवील्या. लोकशाही साठी अपुल्या... सारे पक्ष करतील आता आश्वासनांचा मारा, कातरवेळी गोंधळू नका रे, नका देऊस थारा, निर्भय होऊनी, अंतर्मनाच्या ज्योती पेटविल्या. लोकशाही साठी अपुल्या... पेव फुटतील अफवांचे, नका जावू याला शरण, गुंगी, संमोहन दूर सारिशी, यातच शहाणपण, विवेकाला ठेवा जागे, नका होऊ कळसूत्री बाहुल्या, लोकशाही साठी अपुल्या... धर्माच्या आड विणतील जाळे तुमच्या भोवताल, अडकू नका, राहा सतर्क, करा विचार सखोल, बंधुभावाची बांधून गाठ, जातीपातीच्या भिंती पाडल्या. लोकशाही साठी अपुल्या... या बांधवांनो मतदान करा रे या बांधवांनो मतदान करा रे

प्रा. डॉ. विलास डोईफोडे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची