Loading ...
/* Dont copy */

सीतामाई त्यागमाता - भोंडला गीते (डॉ. मिलिंद खांडवे)

सीतेच्या जीवनकथेच्या माध्यमातून श्रद्धा, त्याग आणि विवेकाचे महत्त्व अधोरेखित करणारे मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी डॉ. मिलिंद खांडवे यांचे भोंडला गीत.

सीतामाई त्यागमाता - भोंडला गीते (डॉ. मिलिंद खांडवे)

सीतेच्या जीवनकथेच्या माध्यमातून श्रद्धा, त्याग आणि विवेकाचे महत्त्व अधोरेखित करणारे भोंडला गीत...

सीतामाई त्यागमाता

डॉ. मिलिंद खांडवे (नाशिक, महाराष्ट्र)

हे भोंडला गीत सीतेच्या जीवनप्रवासातून मिळणाऱ्या नैतिक व आध्यात्मिक शिकवणीचे लोकभावनेतून केलेले प्रभावी चित्रण आहे. सीतेला धरतीमाता मानून तिच्या त्याग, पावित्र्य आणि भोळेपणावर प्रकाश टाकला आहे. रामायणातील वनवास, पंचवटी, सुवर्णमृग आणि लक्ष्मणरेषा या प्रसंगांतून स्त्रीची श्रद्धा, विश्वास आणि त्यातून उद्भवणारा धोका अधोरेखित होतो. शेवटी, गीतात सीतेच्या कथेतून बोध घेत आजच्या काळात विवेक, सावधपणा आणि सीमांचे भान ठेवण्याचा सामाजिक संदेश दिला आहे.

भुलाबाई भुलाबाई, येग येग आमच्या घरी. नांदे प्रेम, सौख्य, स्वास्थ्य, आमच्या ग घरी-दारी. आज ऐक सांगतो, “धैर्यधन्वी” ची गोष्ट खास. ज्ञानाचा तू दीप ग, दे साऱ्यास प्रकाश. फुलांच्या रांगोळीत लिहिलं “सीतेमाई” नाव. माझ्या गाण्यात भर तू, “सत्यधैर्य” असा भाव. आमची ग सीतेमाय, माय तुझी धरणी. आम्ही साऱ्या करतो वंदन तुझ चरणी. जनकाची तू लेक ग, घुटीत आध्यात्म. स्वयंवर होता, जग झाले राम ग. अयोध्येत वास, नाही आला रास. झाला वनवास, पंचवटी निवास. गोदेतीरी दिसला सुवर्ण मृग छान. सीते जैस्या सतीचा, सुटला ग भान. पर्णकुटीत ऐकली रामाची आरोळी. देवाची ती देवी, कशी झाली भोळी. दुष्ट दशानन आला, साधू रूप घेऊनी. बुद्धी भ्रष्ट झाली, लक्ष्मणरेषा ओलांडूनी. भुलाबाई सखुबाई, पार्वती आई यावे. लक्ष्मणरेषेचं भान, आम्ही आता ठेवावे.

डॉ. मिलिंद खांडवे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची