Loading ...
/* Dont copy */

जिजाबाई राष्ट्रमाता - भोंडला गीते (डॉ. मिलिंद खांडवे)

जिजाऊंच्या संस्कारांतून घडलेल्या शिवरायांच्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्य साकार झाल्याचा अभिमान व्यक्त करणारे भोंडला गीत (डॉ. मिलिंद खांडवे).

जिजाबाई राष्ट्रमाता - भोंडला गीते (डॉ. मिलिंद खांडवे)

जिजाऊंच्या संस्कारांतून घडलेल्या शिवरायांच्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्य साकार झाल्याचा अभिमान व्यक्त करणारे भोंडला गीत...

जिजाबाई राष्ट्रमाता

डॉ. मिलिंद खांडवे (नाशिक, महाराष्ट्र)

जिजाऊ मातेच्या संस्कारशक्तीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव करणारे ओजस्वी भोंडला गीत आहे. जिजाऊंनी दिलेले शौर्य, स्वाभिमान आणि धर्मनिष्ठेचे संस्कार शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी ठरले, हे गीतकार ठळकपणे मांडतो. दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास यांसारख्या गुरूंच्या मार्गदर्शनातून शिवराय घडले आणि त्यांनी अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शाईस्तेखान, अफजलखान, पन्हाळा, रायगड, तीनशे साठ गड यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांतून शिवरायांचा पराक्रम, रयतेप्रतीची करुणा आणि राष्ट्रनिर्मितीची दृष्टी प्रकट होते. शेवटी जिजाऊंच्या आशीर्वादातून देशाचे भाग्य उजळावे, अशी सामूहिक प्रार्थना या भोंडला गीतात दिसते.

भुलाबाई भुलाबाई, येग येग आमच्या घरी. नांदे प्रेम, सौख्य, स्वास्थ्य, आमच्या ग घरी-दारी. आज ऐक सांगतो, “राष्ट्रमाते” ची गोष्ट खास. ज्ञानाचा तू दीप ग, दे साऱ्यास प्रकाश. फुलांच्या रांगोळीत लिहिलं “जिजाबाई” नाव. माझ्या गाण्यात भर तू, “वीरजननी” चे भाव. जिजाऊ जिजाऊ, शिवबा ची आऊ. आता आम्हां घरी शिवबा येवो. जिजाऊनं दिला ग शूरतेचा संस्कार. शिवबांनी घडविले पराक्रम थोर. कोंडदेव, समर्थ, असे गुरू झाले. शिवसूर्य शिष्य, देशाला मिळाले. शाईस्त सैतान, त्याचे बोट छाटले. रयतेच्या आयांना मग बरे वाटले. अफझल ग मारिला, प्रतापगड उतरून. हिंदवी स्वराज्याची झाली स्वप्नं पूर्ण. पन्हाळ्याच्या रक्षणा पराक्रम केला. अत्याचारी म्लेच्छ नरकात पाठविला. भगवा फडकावून राजे झाले रायगड. शिवरायांनी जिंकले तीनशे साठ गड. सिंहासनावर बसला रायगडाचा राजा. “छत्रपती जय” बोले सारी हिंदवी प्रजा. भुलाबाई भुलाबाई, जिजाऊला कळू दे. तुझ्या आशीर्वादाने देश भाग्य घडू दे.

डॉ. मिलिंद खांडवे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची