Loading ...

खरंच बरं वाटतं का हो? - मराठी कविता (विकास गजापुरे)

खरंच बरं वाटतं का हो? (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी विकास गजापुरे यांची खरंच बरं वाटतं का हो? ही मराठी कविता.

खरंच बरं वाटतं का हो? - मराठी कविता (विकास गजापुरे)

जीवनाचे वरदान विसरून दुःखाला कवटाळणाऱ्या मनाचा आत्मसंवाद...

खरंच बरं वाटतं का हो?

विकास गजापुरे (नागपूर, महाराष्ट्र)

खरंच बरं वाटतं का हो? ही कविता माणसाच्या दुःखात रमण्याच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकत, आनंदाला सामोरं जाण्याची सौम्य पण प्रभावी आठवण करून देते.

आनंदाला पाठ दाखवित चिंतातूर बसलेले ‘काय झालं?’ म्हटलं तर कसंनुसं हसलेले जगण्यामधलं सुख असं मुद्दाम वगळताना खरंच बरं वाटतं का हो, दुःख चघळतांना? सुखाचे अलवार क्षण तसे कमीच मिळतात सुख त्यांना मिळते जे हसत दुःख गिळतात आंबट चिंबट चेहर्‍याने निराशेत बरळताना खरंच बरं वाटतं का हो, दुःख चघळताना? खरंच खाल्या खस्ताबिस्ता खूप काही केलं पण ते दिवस गेले आता, विसरू झालं गेलं. जुन्या जखमा गोंजारत उगाच हळहळताना खरंच बरं वाटतं का हो, दुःख चघळताना? सदा दुःख आळवण्याचं व्यसन वाढत जातं त्यानेच म्हणे म्हातारपण लवकर जवळ येतं आयुष्याचं वरदान नुसतं फुकट उधळताना खरंच बरं वाटतं का हो, दुःख चघळताना?

विकास गजापुरे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची