Loading ...

एखादा धागा उजेडाचा - मराठी कविता (डॉ. गणेश तरतरे)

एखादा धागा उजेडाचा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी गणेश तरतरे यांची एखादा धागा उजेडाचा ही मराठी कविता.

एखादा धागा उजेडाचा - मराठी कविता (गणेश तरतरे)

त्या खोलीला नाही, ना एकही खिडकी, ना झरोकं...

एखादा धागा उजेडाचा

डॉ.गणेश तरतरे (लेखक सर ज. जी. कला महाविद्यालय, मुंबई येथे चित्रकलेचे प्राध्यापक आहेत)

त्या खोलीला नाही ना एकही खिडकी, ना झरोकं... चारही दिशांनी उसळणारा अंधार मला कवेत घेण्यास आतूर. त्या चार भिंतींच्या बंद खोलीत रुतत चाललोय मी— खोल खोल, काळ्याकुट्ट अंधाराच्या गर्भात, एकटा… उघापाय... हतभागी प्रवासी. मी अंधारात आहे की अंधार माझ्यात उतरला आहे? अंधाराशी झालेले सर्व वाद आता संपले... राहिला फक्त अंधार... अंधार... अंधार. तरीही, मी शोधतोय एक आधार, एखादी उबदार छाया, प्रकाशाची कुशी. जसा शहाजहानच्या बंदिगृहात होती एक उघडकी ज्यातून तो पाहायचा ताजमहल, तसा मी शोधतोय एक कवडसा... एखादा धागा उजेडाचा...

गणेश तरतरे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची