Loading ...

शेताच्या मध्यभागी - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

शेताच्या मध्यभागी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी डॉ.बालाजी राजूरकर यांची शेताच्या मध्यभागी ही मराठी कविता.

शेताच्या मध्यभागी - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

होती झोपडी शेताच्या मध्यभागी उभी खुशीत...

शेताच्या मध्यभागी

डॉ.बालाजी राजूरकर (हिंगणघाट, महाराष्ट्र)

होती झोपडी शेताच्या मध्यभागी उभी खुशीत, सांगू लागली ती व्यथा, निजलेलं बाळ कुशीत. उन्हात, पावसात असे, आधार मीच त्याचा, मी ऐकले कानाने, आवाज त्याच्या रडण्याचा. कित्येकदा उपाशी, झोपताना पाहिलं त्याला, “संसार कसा चालवावा?” विचारांत असे तो बुडाला. पावसाला विनवीत असे, कधी येण्यासाठी, काळीज हेलावून जात, त्याच्या त्या वेदनेसाठी. नसे भीती श्वापदांची, साप आणि विंचवांची, त्यांच्यासवे जगणं हे, खेळी असे नशिबाची. कधी निसर्गाची परीक्षा, त्याने झेलताना पाहिलं, कधी निसर्गाशी भांडताना, त्याचं रूप वेगळंच दिसलं. खळ्यावरची रास पाहून, हरखून जायचा कधी, आनंदाने खाऊ घाले, शेजाऱ्यांनाही प्रेमाने कधी. बांधावरील देव होते, त्याच्या मदतीला सदा, नारळ-शेंदूर अर्पून, करायचा नित्यनियम तिथा. आता घेतलं रूप झोपडीने, फार्महाऊसचं जिथे, पाहवत नाही धंदे, काय चालतात तिथे…

डॉ.बालाजी राजूरकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची