Loading ...

गुरु आणि शिष्य म्हणजे नक्की काय? - माझं मत (विराज काटदरे)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक विराज काटदरे यांचा गुरु आणि शिष्य म्हणजे नक्की काय? हे माझं मत विभागातील लेखन.

गुरु आणि शिष्य म्हणजे नक्की काय? - माझं मत (विराज काटदरे)

...त्या शब्दाची महती आपल्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे आहे!

गुरु आणि शिष्य म्हणजे नक्की काय?

विराज काटदरे (पुणे, महाराष्ट्र)

‘गुरु’ हा शब्द उच्चारणं खूप सोपं आहे. ‘गुरु’ तुमच्यातला अंधार दूर करून तुम्हाला प्रकाशमान करतात वगैरे हे सुद्धा बोलणं/वाचणं फार सोपं आहे. पण आपल्याला सगळ्यांना आतून हे चांगलंच माहीत आहे की, त्या शब्दाची महती आपल्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे आहे. पण पलीकडे आहे म्हणून आपण त्यांचं जे स्थान आहे, त्याकडे दुर्लक्ष करून सगळंच casually घ्यायचंय का...?

आपण विद्यार्थी म्हणून जेव्हा आपल्या गुरूंसमोर (शिक्षकांसमोर) जातो, तेव्हा आपोआप अंगी ‘नम्रताच’ आली पाहिजे, आपली त्यांच्यासमोर ‘बालवत्’ अवस्था झाली पाहिजे. त्यांच्याविषयी ‘आदरयुक्त भीती’ वाटली पाहिजे... हा भाव मनात जागृत होताच, आपलं त्यांच्यासमोर वागणं-बोलणं एका रेषेत ‘आपोआप’ येऊन जातं... पण त्यासाठी ते शिक्षक सुद्धा मनाने प्रेमळ पण बाहेरून काही प्रमाणात कठोर असायला हवेत. तेच जर अती-मोकळेपणा दाखवत असतील, तर विद्यार्थी सुद्धा नकळतपणे नावापूर्ताच आदर ठेवेल...

काही जणांना हे विचित्र वाटेल, पण शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात मैत्री कधीही नसावी. प्रेम भरपूर असावं, पण मैत्रितला ‘अनौपचारीक मोकळेपणा’ दोघांनीही दूर ठेवला पाहिजे. मी ‘विद्यार्थी’ आणि ते माझे ‘गुरु’ हा भेद पाळणं अत्यंत गरजेचं आहे. गुरु म्हटलं की ‘चरण’ हा शब्द आपोआपच येतो. ते ‘चरण’ फक्त सिद्धगुरूंचे नसून, शिक्षकांचेही असतातच. आता ‘शिक्षकांचे चरण’ म्हटल्यावर ते दिसतील तेव्हा लगेच त्यांचे पाय छातीशी घट्ट धरून त्यांना जागेवरून हलूच द्यायचं नाही असं नाही. पण तो ‘भाव’ आपसूकच आतून ‘प्रकटला’ पाहिजे. कारण आपण जर मनात आपल्या गुरूंचा ‘नम्रतारूपी अभिषेक’ सतत केला, तर त्यांनी दिलेलं ज्ञान ही फक्त एक प्रकारची माहिती राहत नसून, ते ज्ञान ‘देवतास्वरूप’ होऊन आपल्याला ‘आशीर्वाद’ देतं... पण काही ठिकाणी काही लोक शिक्षकांना थेट त्यांच्या नावानेच हाक मारतात आणि त्या शिक्षकांनाही त्याचं काहीच वाटत नाही. का, तर ‘आमच्याकडे सगळ्यांचा आदर केला जातो, त्यामुळे थेट नाव घेतलं तर त्यात काय’, हा त्यामागचा विक्षिप्तपणा.

उस्ताद झाकीर हुसैन यांनी सुद्धा त्यांच्या एका जुन्या मुलाखतीत ‘गुरु’ या शब्दाविषयी थोडक्यात सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, ‘बारा सूर आपल्याकडे आहेत आणि बारा सूर पाश्चात्य संगीतातही आहेत. पण तिकडे ज्येष्ठ कलाकारांना थेट नावाने संबोधलं जातं आणि त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. पण माझ्यासमोर जर माझे वडील आले, पंडित रवीशंकर आले आणि काही ज्येष्ठ-श्रेष्ठ कालाकार आले, तर मी त्यांच्या पायांना नमस्कार करून, त्यांना वंदन करून मगच माझी कला सादर करतो. हा आपल्या देशातल्या आणि पाश्च्यात्य देशातल्या भावांमधला फरक आहे आणि त्याच प्रकारे कला बाहेर प्रकट होते’...

...त्यामुळे 'गुरु' आणि ‘शिष्य’ म्हणजे नक्की काय, याचा आपण नीट विचार करण्याची गरज आहे!

विराज काटदरे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची