Loading ...

एप्रिल: एक पवित्र संदेश - मराठी कविता (आकाश पवार)

एप्रिल: एक पवित्र संदेश (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी आकाश पवार यांची एप्रिल: एक पवित्र संदेश ही मराठी कविता.

एप्रिल: एक पवित्र संदेश - मराठी कविता (आकाश पवार)

एप्रिल आला प्रकाश घेऊन, भक्ती - शक्तीचा विकास घेऊन... एप्रिल: एक पवित्र संदेश

एप्रिल: एक पवित्र संदेश

आकाश पवार (शिराढोण, कळंब, धाराशिव)

एप्रिल आला प्रकाश घेऊन, भक्ती - शक्तीचा विकास घेऊन । आकाशातुन आला किरण तेजाचा, धर्म, समता, शौर्य संदेशाचा ॥ १ ॥ राम जन्मला या पवित्र धरेवर, अधर्म नाशाया आला तो नरवर । आकाशही गाऊ लागले गुणगान, रघुकुल शिरोमणी श्रीराम महान ॥ २ ॥ महावीरांचा झाला जयघोष, अहिंसेचा त्यांनी दिला संदेश । संयम, सत्य, शांतीचा दीप, आकाशभर झाले नवचैतन्य सजीव ॥ ३ ॥ पवनसुत हनुमान बलवीर, रामभक्त, संकट मोचन अधीर । आकाशात गेला तेव्हाही निर्धार, सेवा, समर्पण, भक्ती अपार ॥ ४ ॥ बाबासाहेब आले ज्ञानदीप घेऊन, शोषितांना दिली प्रतिष्ठेची शिदोरी । आकाशात उमटले समतेचे गान, न्याय, बंधुता, स्वाभिमानाचा अरमान ॥ ५ ॥ गुड फ्रायडेचा तो संदेश महान, प्रेम, क्षमा, बलिदानाचे ज्ञान । येशू ख्रिस्ताने सहन केले दुःख, आकाशभर गाजले शांतीचे शब्द ॥ ६ ॥ ईस्टर संडेचा आनंदाचा साज, विश्वास, श्रद्धेचा चिरंतन गंध । नव्या जीवनाचा नवा प्रकाश, आकाशात लखलखतो तो सुवास ॥ ७ ॥ हा एप्रिल महिना तेजाचा साक्षी, आकाश हसावे, करू वंदना भक्तीची । सर्व महापुरुषांचा आदर्श घ्यावा, एकतेचा संदेश जागवावा ॥ ८ ॥ ✨ जय श्रीराम! जय भीम! जय महावीर! जय हनुमान! जय मानवता!

आकाश पवार यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची