Loading ...
/* Dont copy */

सुभेदार बाजीराव बेलोसे समाधी - ऐतिहासिक स्थळे (स्वप्नील जांभळे)

सुभेदार बाजीराव बेलोसे समाधी (ऐतिहासिक स्थळे) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक स्वप्नील जांभळे यांचा सुभेदार बाजीराव बेलोसे समाधी हा मराठी लेख.

सुभेदार बाजीराव बेलोसे समाधी - ऐतिहासिक स्थळे (स्वप्नील जांभळे)

अर्नाळा किल्ल्याचे पहिले सुभेदार ‘बाजीराव बेलोसे’ यांची समाधी अर्नाळा किल्ल्याजवळ आहे...

सुभेदार बाजीराव बेलोसे समाधी

स्वप्नील जांभळे (स्वप्नील चंद्रकांत जांभळे, दापोली)

अर्नाळा किल्ल्यास लागुनच राम मंदिरच्या समोर सुभेदार बाजीराव बेलोसे यांची समाधी शेवटच्या घटका मोजत आहे. उपलब्ध छायाचित्रांच्या माध्यमातून स्पष्ट समजू शकते की झाडांने या समाधीला पूर्णपणे वेढले आहे. तसे म्हटले तर समाधी कमी आणि झाड जास्त दिसत आहे. झाडाने वेढल्यामुळे ही समाधी जणू गुदमरू लागली आहे. जवळ गेले तर ही समाधी नाही तर देऊळच वाटते; मात्र समाधीच्या दर्शनासाठी आत प्रवेश केल्यावर आपल्याला समोरच एक पेशवेकालीन सुंदर कलाकृती दिसते तीच सुभेदार बाजीराव बेलोसे यांची समाधी आहे.

सुभेदार बाजीराव बेलोसे समाधी
सुभेदार बाजीराव बेलोसे समाधी

आतील बाजूस घुमट आणि त्यावर नक्षीदार काम केलेले दिसते. पेशवेकालीन सुबक चित्रे, कोरीव काम हे इतिहासातील साक्ष देतात. बाजीराव चिमाजी अप्पा यांनी वसईची मोहीम आखली तेव्हा प्रथम पोर्तुगीजांनी काबीज केलेला अर्नाळा किल्ला जिंकणे जरुरी होते. सर्वच सागरी किल्ल्यांवर सत्ता काबीज करण्याचे पेशव्यांनी ठरवले होते; कारण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे भाकीत केले होते की - “परकीय सत्ता ही सागरीमार्गे आक्रमण करू शकते!”.

सुभेदार बाजीराव बेलोसे समाधी
सुभेदार बाजीराव बेलोसे समाधी

छत्रपतींच्या या अनुमानानुसर जर आपण सागरीमार्ग स्वराज्यात आणले तर राज्य सुरक्षित राहिल. सागरी मार्गाने या परकीय सत्तेचे मोठे व्यापारही चालत असे. लाकूड, दगड, धान्य, कापड अशा अनेक प्रकारच्या वस्तु बाहेरगावी निर्यात केल्या जात असत. ‘वसई किल्ला’ काबीज करायचा असेल तर पहिले ‘अर्नाळा किल्ला’ काबीज करावे लागेल असे शंकररावजी पंथ यांनी ‘चिमाजी अप्पा’ यांना कानमंत्र आधीच दिला होता. क्षणाचाही विलंब न करता शंकरराव पंतांनी अर्नाळा किल्ल्यावरील पोर्तुगीजांनवर चालून जाण्यासाठी बाजीराव बेलोसे, गंगाजी नाईक, रायजीराव सुर्वे आणि त्यांच्याबरोबर आजूबाजूचे ४०० लोक अर्नाळा किल्ल्यावर पाठवले आणि २८ मार्च १७३७ रोजी अर्नाळा किल्ला काबीज करण्यात यश मिळाले. त्या पाठोपाठ ‘चिमाजी अप्पा’ यांनी वसईची मोहीम ही फत्ते केली.

सुभेदार बाजीराव बेलोसे समाधी
सुभेदार बाजीराव बेलोसे समाधी

यामध्ये सुबेदार बाजीराव बेलोसे यांची अर्नाळा किल्ल्याच्या मोहीमेची कामगिरी बघून त्यांना सुभेदार ही पदवी बहाल केली. तसेच अर्नाळा किल्ला बांधण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका ठरली होती. या किल्ल्याचे पहिले किल्लेदार म्हणून चिमाजी अप्पा यांनी बाजीराव बेलोसे यांना सुभेदार ही पदवी बहाल केली. या समाधीचे बांधकाम उत्कृष्टपणे केले आहे. त्यावेळी सुभेदार बेलोसे शत्रूंच्या लढाईसाठी किती शूरवीर होते ते या समाधीवरून दिसून येते.

ज्या-ज्या वेळी परकीय आक्रमणे झाली त्या-त्या वेळी या शूरवीरांनी आपल्या तलवारीने शत्रूला पाणी पाजले हा इतिहास आहे; पण आज याच समाधीला बघून मन सुन्न होते. एवढे महान कार्य करुन सुद्धा आज जो काही इतिहास उरला आहे तो इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असे प्रथम दर्शनी दिसते. असा जिवंत इतिहास जपायचा असेल आणि ‘सुभेदार बाजीराव बेलोसे’ यांच्या समाधीला मोकळे श्वास देयाचे असेल तर पुरातत्त्व विभागाने आणि तेथील स्थानिक प्रशासनाने ऐतिहासिक ठिकाणवर जाऊन लक्ष दिले पाहिजे असे वाटते.

स्वप्नील जांभळे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची